AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्य लढ्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्याची दास्तान, देशासाठी शहीद झालेल्या अशफाक, रामप्रसाद बिस्मिल आणि रोशन सिंह या दोस्तांची गोष्ट

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घटना आजही आपल्याला प्रेरणा देतात. भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामातील राम प्रसाद बिस्मील आणि अशफाक उल्ला खान यांच्या मैत्रीची कहाणी आजही प्रेरणादायी ठरते.

स्वातंत्र्य लढ्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्याची दास्तान, देशासाठी शहीद झालेल्या अशफाक, रामप्रसाद बिस्मिल आणि रोशन सिंह या दोस्तांची गोष्ट
अशफाकउल्ला खान रामप्रसाद बिस्मिल रोशन सिंह
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 6:33 AM
Share

नवी दि्लली: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानं देशभरात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातोय. भारताला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी इथल्या असंख्य ज्ञात अज्ञात सामान्य माणसांनी, कामगारांनी, महिलांनी, शेतकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी लढा उभारला.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घटना आजही आपल्याला प्रेरणा देतात. भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामातील राम प्रसाद बिस्मील आणि अशफाक उल्ला खान यांच्या मैत्रीची कहाणी आजही प्रेरणादायी ठरते. काकोरी कटातील सहभागामुळं राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान, रोशन सिंह यांना इंग्रजांनी आजच्याच दिवशी म्हणजे 19 डिसेंबर 1927 फाशी दिलं होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी आपलं जीवन अर्पण करणाऱ्या या दोन महान क्रांतिकारकांच्या मैत्रीची गोष्ट जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काकोरी कट

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, अशफाक उल्ला खान आणि रोशन सिंह यांच्यासह इतर साथीदारांनी क्रांतिकारी पार्टीसाठी पैसा जमा करण्यासठी लखनऊ जवळच्या काकोरी येथे जमा झाले. 9 ऑगस्ट 1925 च्या रात्री काकोरी आणि आलमनगर रेल्वे स्थानकादरम्यान सहारनपूर लखनऊ एक्स्प्रेसमधील इंग्रजांचा सोने चांदीचा खजिना लुटण्यात आला. अवघे दहा पंधरा क्रांतिकारक विरुद्ध इंग्रज असा सामना झाला. चंद्रशेखर आझाद यावेळी इंग्रजांच्या हाती लागले नाहीत.

आयुष्यभर दोस्ती जपणाऱ्या दोस्तांना वेगवेगळ्या तुरुंगात फाशी

रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, अशफाक उल्ला खान, रोशन सिंह यांना अटक करण्यात आली. हे सर्व क्रांतिकारक हिंदुस्थान रिपब्लिकन पार्टीद्वारे स्वातंत्र्यासाठी काम करत होते. 17 डिसेंबरला 1927 रोजी राजेंद्रनाथ लाहिरी यांना गोण्डा तुरुगांत फाशी देण्यात आली. 19 डिसेंबरला रामप्रसाद बिस्मिल यांना गोरखपूर, अशफाक उल्ला खान यांना फैजाबाद आणि रोशन सिंह यांना इलाहाबाद तुरुंगात फाशी देण्यात आलं होतं.

राम प्रसाद बिस्मिल कोण होते?

पंडित राम प्रसाद बिस्मिल हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात झाला होता. ते शायर आणि कवी म्हणून देखील प्रसिद्ध होते.

राजेंद्रनाथ लाहिरी आणि रोशन सिंह

राजेंद्रनाथ लाहिरी बनारस हिंदू विद्यापीठात एम.एचं शिक्षण घेत होते. वयाच्या 24 व्या वर्षा पर्यंत ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले होते. 1925 मध्ये त्यांना कोलकात्याजवळील दक्षिणेश्वर बॉम्ब फॅक्टरीप्रकरणी पकडून सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर, रोशन सिंह यांना काकोरी कटापूर्वी देखील स्वातंत्र्याच्या लढाईमुंळं इंग्रजांनी अटक केली होती. रोशन सिहं हे उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधील होते. शेतकऱी आंदोलनांसाठी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता.

अशफाक उल्ला खान

अशफाक उल्ला खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1900 रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात झाला होता. अशफाक उल्ला खान त्यांच्या घरी सर्वात लहान होते. शायर म्हणून ते प्रसिद्ध होते.

रामप्रसाद बिस्मिल अशफाक उल्ला खान यांच्या मैत्रीची सुरुवात

पंडित रामप्रसाद बिस्मिल हे प्रसिद्ध शायर आणि कवी होते. त्यांच ना व मैनपुरी कट खटल्यात आलं होतं. अशफाक उल्ला खान यांनी त्यांच्या मोठ्या भावांकडून रामप्रसाद बिस्मिल यांच्या विषयी ऐकलं होतं. अशफाक उल्ला खान यांनी देखील भारतीय स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी त्यांना रामप्रसाद बिस्मिल यांना भेटायचं होतं. असहकार आंदोलन अचानक मागं घेतल्यानं महात्मा गांधीना मानणाऱ्या अशफाक उल्ला खान यांनी सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग स्वीकराण्याचं ठरवलं. शाहजहांपूरमध्ये एका सभेत देण्यासाठी रामप्रसाद बिस्मिल आले होते. त्यावेळी अशफाक उल्ला खान त्यांना भेटण्यासाठी गेले होते. भारतीय स्वातंत्र्यांचं ध्येय आणि कविता, शायरी या गोष्टी अशफाक उल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांची मैत्री भक्कम करणाऱ्या ठरल्या.

अशफाक उल्ला खान यांचं तुरुंगातून पाठवलेल्या अखरेच्या पत्राचा काही भाग

भारतमातेच्या रंगमंचावर आम्ही आमची भूमिका पार पाडली आहे. चूक केलं बरोबर, जे करायचं ते आम्ही केलं. स्वातंत्र्य मिळवण्याच्या भावनेतून ते आम्ही केलं.

हिंदुस्थानी भावांनो, तुम्ही कोणत्याही धर्माला किंवा संप्रदायाला मानणारे असला तरी तुम्ही देशाच्या कामी या. आपआपसात व्यर्थ लढू नका. रस्ते वेगवेगळे असले तरी आपल्या सर्वांचा उद्देश एक आहे. देशातील सात कोटी मुस्लीम जनतेपैकी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी फाशीवर जात असलेला पहिला व्यक्ती म्हणून अभिमान वाटतो. शेवटी सर्वांना सलाम, अशा आशयाचं पत्र अशफाक उल्ला खान यांनी फैजाबादच्या तुरुंगातून लिहिलं होतं.

स्वातंत्र्यासाठी मतभेद विसरुन एकत्र येण्याची भावना

रामप्रसाद बिस्मिल यांचा उजवा हात अशपाक उल्ला खान असल्याचं इंग्रजांनी म्हटलं होतं. एका कट्टर आर्यसमाजी व्यक्तीचा स्वातंत्र्यांच्या क्रांतीच्या लढाईतील उजवा हात अशफाक उल्ला खान यांच्या सारखा कट्टर मुस्लीम व्यक्ती असू शकतो तर भारतातील अन्य हिंदू मुस्लीम व्यक्तींनी स्वातंत्र्यासाठी आपआपसातले छोटे मोठे मतभेद विसरुन एकत्र यायला हवं. मी मुस्लीम समाजातील एका तरुणाद्वारे भारताला दाखवून दिलंय की मुस्लीम तरुण देखील हिंदू तरुणांसारखं देशासाठी बलिदान देत आहेत. अशफाक उल्ला खान सर्व परीक्षांमध्ये यशस्वी झाला, असं राम प्रसाद बिस्मिल यांच्या वतीनं शहीद भगतसिंह यांनी जारी केलेल्या तुरुंगातून लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

काकोरी कट खटल्याच्या सुनावणीदरम्यान रामप्रसाद बिस्मिल यांनी बिहारच्या पाटना येथील अजिमाबाद येथील प्रसिद्ध शायर अजिमाबादी यांचं सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मै हे, ही कविता म्हटली. पुढे ती रामप्रसाद बिस्मिल यांच्याशीच जोडली गेली.

काकोरी कटात सहभागी असलेले इतर क्रांतिकाकर आणि 17 आणि 19 डिसेंबरला स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या राजेंद्रनाथ लाहिरी, पंडित रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि रोशन सिंह या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन….

इतर बातम्या:

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासमोरच संकट वाढतंय, राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 48 वर

राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार, कर्नाटकातील घटनेनंतर राष्ट्रवादीची घोषणा

Ashfaqullah Khan RamPrasad Bismil Roshan Singh Friendship in freedom war martyrs of Kakori

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.