बी.टेकसह इंजिनिअरिंगची दुसरी पदवी मिळवण्याची संधी, AICTE चा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

एआयसीटीईकडून बी.टेकचे विद्यार्थी त्यांच्या मुख्य अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इंजिनीअरिंगच्या इतर शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकतात, असं जाहीर करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे अभियांत्रिकीच्या इतर शाखांमध्ये प्रवेश घेता येईल, असं सांगण्यात आलं आहे.

बी.टेकसह इंजिनिअरिंगची दुसरी पदवी मिळवण्याची संधी, AICTE चा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
AICTE
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 11:51 AM

नवी दिल्ली: ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेला आहे. एआयसीटीईकडून बी.टेकचे विद्यार्थी त्यांच्या मुख्य अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इंजिनीअरिंगच्या इतर शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकतात, असं जाहीर करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे अभियांत्रिकीच्या इतर शाखांमध्ये प्रवेश घेता येईल, असं सांगण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांच्या मागणीवर निर्णय

बी.टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांकडून विनंत्या येत होत्या. बी. टेक आणि बी.ईच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या दुसऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. तसेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षामध्ये त्यांच्या महाविद्यालयात एखादी शाखा नसेल तर दुसऱ्या महाविद्यालयात ते दुसऱ्या शाखेत प्रवेश घेऊ शकतात.

एआयसीटीईच्या बैठकीत निर्णय

एआयसीटीई कार्यकारी समितीसमोर लॅटरल एंट्रीबाबत निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एआयसीटीईच्या कार्यकारी समितीने याबाबत तांत्रिक विद्यापीठांना निर्देश दिले आहेत. तांत्रिक विद्यापीठांना ज्या विद्यार्थ्यांना बीटेक/बीई मध्ये शाखा बदलायची असल्यास त्यासंबंधी व्यवस्था तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बी.टेक आणि बी.ईचे विद्यार्थी ज्यावेळी एखाद्या अतिरिक्त अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील त्यावेळी त्यांनी तो अभ्यासक्रम दोन ते तीन वर्षात पूर्ण करणं आवश्यक आहे.

प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनिअरिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत देशातील आठ राज्यातील 14 महाविद्यालयात 5 भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं.

14 अभियांत्रिकी महाविद्यालयात 5 भाषेत अभ्यासक्रम सुरु

8 राज्यातील 14 अभियांत्रिकी महाविद्यालय मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 5 प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरु होत आहे. यामध्ये हिंदी, तामिळ, तेलुगू, मराठी आणि बांगला भाषेचा समावेश आहे. तर देशातील 11 भाषांमध्ये अभ्यासक्रम भाषांतरीत करण्यात येत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. देशातील गरीब विद्यार्थ्यांना, मध्यम वर्गातील आणि दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं. या विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य आणि कौशल्यासोबत फायदा होईल, असंही ते म्हणाले होते.

इतर बातम्या:

…तर मोदीसाहेब बोलताहेत ते सर्व धर्मांच्या विरोधात आहे का?, नवाब मलिकांनी भाजप नेत्यांना फटकारले

भाजप नेते मोदींचंसुद्धा ऐकत नाहीत; लोकल ट्रेन आणि मंदिरे उघडण्यासाठीच्या आंदोलनावरुन नवाब मलिकांचा टोला

B Tech Students Can Get Lateral Entry Into Another Engineering Course after first year decision taken by AICTE

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.