विद्यार्थ्यांनो, 12 वी च्या निकालाबाबत काही तक्रार आहे?, 25 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवा, बोर्डाचं आवाहन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 12वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना या निकालावर काही आक्षेप/तक्रारी असतील तर त्या संबंधित विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे तक्रारीचा अर्ज करावा, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांनो, 12 वी च्या निकालाबाबत काही तक्रार आहे?, 25 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवा, बोर्डाचं आवाहन
विद्यार्थी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 12वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना या निकालावर काही आक्षेप/तक्रारी असतील तर त्या संबंधित विद्यार्थ्यांनी विहित करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये (प्रपत्र -अ) अर्ज करण्याबाबत कळविले आहे.

25 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचं बोर्डाचं आवाहन

त्यानुसार दि. 25 सप्टेंबर 2021 अखेर विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत व अन्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 च्या मूल्यमापनासंदर्भात दाखल याचिका क्र.620/2021 बाबत सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दि. 24/06/2021 रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर झाल्यानंतर या निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेशित केलेले आहे.

यंदा 12 वीचा निकाल निकाल 99.63 टक्के

यंदा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. यंदा 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहेत. तर 46 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं.

इयत्ता बारावीचा निकाल :

एकूण निकाल 99.63 टक्के
विज्ञान – 99.45 टक्के
कला – 99.83 टक्के
वाणिज्य 99.81 टक्के
एमसीव्हीसी – 98.8 टक्के

कुणाचा निकाल किती?

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के
तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 टक्के
यंदाच्या निकालातही मुलींची बाजी. मुलींचा निकाल 99.81 टक्के तर मुलांचा निकाल 99.54 टक्के
यावर्षीचा निकाल 8.97 टक्क्यांनी वाढला
विज्ञान मागील वर्षी 96.93 टक्के, यावर्षी 99.45 टक्के, 2.52 टक्क्यांनी जास्त
कला शाखेचा मागच्या वर्षीचा निकाल 82.63 टक्के होता, यंदा हा निकाल 99.45 टक्के, 17.20 टक्क्यांनी जास्त
वाणिज्य शाखेचा मागच्या वर्षीचा निकाल 91.27 टक्के होता, यावर्षी 99.91 टक्के निकाल लागला. हा निकाल 8.64 टक्क्यांनी जास्त आहे.
एमसीव्हीसीचा मागील वर्षाचा निकाल 86.07 टक्के होता, यावर्षी 98.80 टक्के आहे, हा निकाल 12.73 टक्क्यांनी जास्त आहे.

कोरोनामुळं परीक्षा रद्द

कोविड 19च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात आला.

(Board appeals to students to register objections regarding 12th exam result 2021 September 25)

हे ही वाचा :

HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage: 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; वाचा, 12वीचा सविस्तर निकाल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI