AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Term 1 exam Result : सीबीएसईकडून दहावी बारावीच्या टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता, रिझल्ट डाऊनलोड कसा करायचा?

सीबीएसईनं (CBSE ) नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (NEP) दहावी आणि बारावीची परीक्षा सत्र पद्धतीत घेण्याचा निर्णय घेतला होता.

CBSE Term 1 exam Result : सीबीएसईकडून दहावी बारावीच्या टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता, रिझल्ट डाऊनलोड कसा करायचा?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 10:47 AM
Share

CBSE Term 1 exam Result नवी दिल्ली : सीबीएसईनं (CBSE ) नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (NEP) दहावी आणि बारावीची परीक्षा सत्र पद्धतीत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आज दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांचा निकाल (Class 10 and 12 Result) सीबीएसईकडून जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. सीबीएसई दहावी बारावी टर्म 1 परीक्षेचा निकाल www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.

विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता

सीबीएसईतर्फे टर्म वन परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात घेण्यात आली होती. पहिल्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात होती. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्न विचारण्यात आले होते. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आता निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. www.cbse.gov.in आणिwww.cbseresults.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर पाहायला मिळेल.

सीबीएसई टर्म 1 परीक्षेचा निकाल कसा पाहमार

स्‍टेप 1: सीबीएसईची वेबसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या. स्‍टेप 2: लेटेस्‍ट अपडेट सेक्‍शन वर क्लिक करा तिथे रिझल्ट लिंक वर क्लिक करा. स्‍टेप 3: आता डाऊनलोड रिझल्‍ट लिंक पर क्लिक करा. स्‍टेप 4: लॉगिन पेजवर दहावी आणि बारावी पर्याय निवडा, रोल नंबर आणि जन्मतारीख नोंदवा. स्‍टेप 5: यानंतर निकाल उपलब्ध होईल, तो डाऊनलोड करा.

Digi locker

डिजीलॉकर एक ऑनलाईन क्लाऊड सॉफ्टवेअर आहे. यामध्ये आपण निकाल चेक करुन मार्कशीटही डाऊनलोड करु शकता. त्यासाठी तुम्हाला डिजीलॉकर वेबसाईटवर जाऊन ‘View result’ वर क्लिक करा. तिथे तुमचा रोल नंबर टाका, क्लास निवडा आणि अॅडमिट कार्ड टाका. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढता येऊ शकेल.

SMS आणि IVRS

विद्यार्थी SMS नेही आपला निकाल पाहू शकतात. मोबाईलवरुन space space हा तपशील भरुन 7738299899 या नंबरवर SMS करा. निकाल जाहीर झाल्यानंतर यावर निकाल मिळू शकेल. याशिवाय IVRS द्वारेही निकाल ऐकायला मिळू शकतो. त्यासाठी 011-24300699 नंबरवर कॉल करा.

इतर बातम्या:

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचं पुढचं पाऊल, ओएमआर पडताळणी सुरु

Maharashtra School Reopen : नियमांचं पालन करत शाळांची घंटा वाजणार, तर, वर्ग पूर्ण बंद ठेवावा लागेल, राजेश टोपेंचं सतर्कतेच आवाहन

CBSE class 10 12 Term1 exam result to be released today Check details here for result updates

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.