AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra School Reopen : नियमांचं पालन करत शाळांची घंटा वाजणार, तर, वर्ग पूर्ण बंद ठेवावा लागेल, राजेश टोपेंचं सतर्कतेच आवाहन

Maharashtra School Reopen News: राज्यात काही ठिकाणी शाळा आजपासून सुरु होत आहेत. तर, काही ठिकाणी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्ण संख्या पाहता काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही.

Maharashtra School Reopen : नियमांचं पालन करत शाळांची घंटा वाजणार, तर, वर्ग पूर्ण  बंद ठेवावा लागेल, राजेश टोपेंचं सतर्कतेच आवाहन
manapa school
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 9:55 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे (Corona) रुग्ण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोना आणि ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण, कमी मृत्यूदर आणि घरीच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पाहता शाळा सुरु करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली होती. याशिवाय ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा देखील समोर आल्यानं शाळा पुन्हा सुरु (School Reopen) करण्याची मागणी जोर धरु लागली. शालेय शिक्षण विभागानं ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी आहे. त्याठिकाणी नियमावलीसह शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला. त्यानुसार राज्यात काही ठिकाणी शाळा आजपासून सुरु होत आहेत. तर, काही ठिकाणी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्ण संख्या पाहता काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही.

आजपासून शाळा कुठं सुरु होणार

  1. मुंबई : पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत.
  2. ठाणे : पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत.
  3. नाशिक : पहिली ते बारावीचे वर्ग आहेत.
  4. जळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळा सुरु होणार मात्र शहरी भागातील शाळा तूर्तास बंद राहणार
  5. औरंगाबाद : फक्त दहावी आणि बारावी वर्ग सुरु होतील.
  6. नंदुरबार : फक्त पहिली ते चौथीचे वर्ग ऑनलाईन सुरु राहणार आहेत. पाचवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरु राहणार आहेत. शाळांची वेळ 11 ते 3 पर्यंत असेल.
  7. जालना : शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग तर ग्रामीण भागात पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु राहणार आहेत. जिल्ह्यात एकूण शाळा 2218 शाळा आहेत.
  8. सातारा : पहिली ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार आहेत.
  9. लातूर : संपूर्ण जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या शाळा सुरु होणार
  10. अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते बारावीच्या शाळा सुरु होणार असून शहरी भागातील शाळा तूर्तास बंद राहणार आहेत.
  11. परभणी : जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असून पहिली ते आठवीच्या शाळा तूर्तास बंद असणार आहेत.
  12. नांदेड : नववी ते बारावीच्या शाळा सुरु होणार असून पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहणार आहेत.
  13. उस्मानाबाद : दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु होत असून इतर वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय 29 जानेवारीला होणार आहे
  14. वर्धा : संपूर्ण जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या शाळा सुरु होणार आहेत.
  15. गडचिरोली : पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. शाळांमधील पहिली ते चौथीचे वर्ग बंद राहणार आहेत.

आज शाळा सुरु न होणारे जिल्हे

  1. कोल्हापूर : 25 जानेवारीपासून पहिली ते बारावीच्या शाळा सुरु होणार
  2. नागपूर : 26 जानेवारी रोजी आढावा घेऊन निर्णय जाहीर होणार
  3. सांगली : 1 फेब्रुवारी पासून पहिली ते बारावीच्या शाळा सुरु होणार
  4. पालघर : 8 ते 12 वीचे वर्ग 27 जानेवारी पासून सुरु होणार आहेत.पहिली ते सातवीच्या शाळा तूर्तास बंद राहणार आहेत.
  5. धुळे : आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा 27 जानेवारीला सुरु होणार आहेत. सध्या प्राथमिक शाळा या बंद असणार आहेत.
  6. चंद्रपूर : शाळा सुरु करण्या संदर्भात अजून निर्णय झाला नाही आहे.
  7. रत्नागिरी : शाळा सुरु करण्यासंदर्भात 26 जानेवारी रोजी निर्णय होणार आहे.
  8. वाशीम : जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारी रोजी निर्णय होणार आहे.
  9. हिंगोली : जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारी ला निर्णय होणार आहे.
  10. यवतमाळ : 27 जानेवारी पासून 9 ते 12 च्या शाळा सुरु होणार आहेत. पहिली ते आठवीच्या शाळा बंद राहणार आहेत.
  11. अहमदनगर : शाळा सुरु करण्यासंदर्भात 25 जानेवारी ला निर्णय होणार आहे.
  12. रायगड : शाळा सुरु करण्या संदर्भात आज जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.
  13. सोलापूर : शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाचा अजून निर्णय नाही.
  14. बुलडाणा : शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचा तूर्तास निर्णय नाही.
  15. बीड : अजून तूर्तास निर्णय नाही आज संध्याकाळी यासंदर्भात बैठक होणार आहे.
  16. गोंदिया : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही.
  17. भंडारा : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही.
  18. अमरावती : कोरोनाची वाढती आकडेवारी बघता पुढचा एक आठवडा जिल्ह्यातील शाळा बंद असणार आहेत.
  19. पुणे : शाळा सुरु करण्याचा निर्णय हा पुढच्या आठवड्यात होणार आहे.
  20. सिंधुदुर्ग : शाळा सुरु करण्या संदर्भात 1 फेब्रुवारीला निर्णय होणार आहे.

शाळा सुरु करण्याबाबत आरोग्यमंत्री काय म्हणाले?

राज्यातील शाळा सुरू करण्या संदर्भात शिक्षण विभागाला सूचना करण्यात आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासन निर्णय घेण्यात येणार असल्याचे तसेच शाळा सुरू झाल्यानंतर मुलांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. एकाही मुलाला कोरोना संसर्ग झाल्यास त्या वर्गाला तात्काळ सुट्टी दिली पाहिजे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. शाळा पण सुरू झाल्या पाहिजे आणि कोरोना संसर्ग पण वाढू नये याची काळजी घेण्यात येणार आहे. तसेच रुग्णाची संख्या कमी झाल्यास निर्बंध कमी करण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ

इतर बातम्या:

मुंबईतील पहिल्या ‘सेफ स्कूल झोन’चा प्रयोग यशस्वी; 93 टक्के विद्यार्थ्यी म्हणाले, पूर्वीपेक्षा रस्त्यावरून चालणे अधिक सोपे

Varsha Gaikwad : पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार, सीबीएसईच्या धर्तीवर शिक्षण देणार : वर्षा गायकवाड

Maharashtra School Reopen today check list of districts where school starts and Varsha Gaikwad Rajesh Tope appeal to local administration

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.