TET Exam Scam : टीईटी घोटाळ्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचं पुढचं पाऊल, ओएमआर पडताळणी सुरु

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचं पुढचं पाऊल, ओएमआर पडताळणी सुरु
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9

पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार (TET Exam Scam) झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते.

प्रदीप कापसे

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 24, 2022 | 9:21 AM

पुणे: पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार (TET Exam Scam) झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून आता टीईटी घोटाळ्यासंदर्भात ओएम आर शीटची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेतील 12 अधिकाऱ्यांच्या मदतीनं तपासणी केली जात आहे. ओएमआर शीट तपासणी मधून घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे.

1500 ओएमआर शीटची तपासणी

पुणे सायबर पोलिसांनी टीईटी घोटाळ्यासंदर्भात ओएमआर शीटची कसून चौकशी सुरू केली आहे. पुणे पोलिसांची टीम यामध्ये राज्य परीक्षा परिषदेतील 12 अधिकाऱ्यांच्या मदतीनं तपासणी करतेय. ओएमआर शीटमधून घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी टीईटी परीक्षेसंदर्भातील सगळा डेटा, पेनड्राईव्ह ताब्यात घेतले आहे. टीईटी घोटाळा प्रकरणात आतापर्यंत आयुक्त तुकाराम सुपे,सुखदेध डेरे,अश्विन कुमार ,प्रितीश देशमुख यांच्यासह सहकाऱ्यांना अटक केली आहे. 1500 ओएमआर शीटची तपासणी करण्याचं काम सुरू करण्यात आलीय.

टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी सुरु

टीईटी परीक्षेतील घोटाळा समोर आल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाकडून टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी सुरु करण्यात आली आहे. राज्यातून 6 हजार प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे जमा झाली आहे. मनुष्यबळाअभावी प्रमाणपत्रांच्या तपासणीला वेळ लागणार आहे. जिल्हानिहाय यादी तयार करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. यादी तयार करून पाच पथकं तपासणीसाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष हरुण आतार यांनी ही माहिती दिली आहे. टीईटी प्रमाणपत्र पडताळणीतून बोगस प्रमाणपत्र बाहेर येण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

TET Exam : टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांवर नवं संकट, पगार थांबवण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना, मुख्याध्यापकांना इशारा

TET Exam Scam : टीईटी परीक्षा गैरप्रकारातील मुख्य आरोपींना कोट्यवधी मिळवून दिले, पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

TET Exam Scam Pune Cyber Police started investigation of TET exam omr sheet verification with help of msce officers

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें