SSC CHSL Tier I Admit Card 2020 : सीएचएसएल टायर -1 परीक्षा प्रवेश पत्र जारी, असे करा डाउनलोड

SSC CHSL Tier I Admit Card 2020 : सीएचएसएल टायर -1 परीक्षा प्रवेश पत्र जारी, असे करा डाउनलोड
SSC

टियर -1 परीक्षा प्रवेश पत्र SSC CHSL Tier I Admit Card 2020) वेबसाईटवर अपलोड केले गेले आहे. सीएचएसएल टायर I ची परीक्षा 12 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान घेण्यात येईल. (CHSL Tier-1 Exam Admit card issued, Download it)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 28, 2021 | 2:56 PM

नवी दिल्ली : कर्मचारी निवड आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सीएचएसएल टायर -1 परीक्षेचे प्रवेश पत्र (SSC CHSL Tier I Admit Card 2020) जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वरून डाउनलोड करू शकतात. या भरती परीक्षेतून एकूण 4726 पदांवर भरती होईल. (CHSL Tier-1 Exam Admit card issued, Download it)

12 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान होणार परीक्षा

एसएससीकडून सीएचएसएल (Combined Higher Secondary (10+2) Level) परीक्षेची अधिसूचना 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबरपर्यंत सुरू होती. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टियर -1 आणि टियर -2 परीक्षा द्यावी लागेल. टियर -1 परीक्षा प्रवेश पत्र SSC CHSL Tier I Admit Card 2020) वेबसाईटवर अपलोड केले गेले आहे. सीएचएसएल टायर I ची परीक्षा 12 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान घेण्यात येईल.

कसे कराल प्रवेश पत्र डाउनलोड?

प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी प्रथम ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. मुख्यपृष्ठावरील “STATUS / DOWNLOAD ADMIT CARD FOR COMBINED HIGHER SECONDARY LEVEL (10+2) EXAMINATION – 2020 (TIER- I) TO BE HELD FROM 12/04/2021 TO 26/04/2021” लिंकवर क्लिक करा. आता नोंदणी आयडी आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा. प्रवेश पत्र स्क्रिनवर ओपन होईल. ते डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या. प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करा.

भरतीचा तपशील

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 4726 पदांवर भरती होईल. लोअर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, टपाल सहाय्यक, क्रमवारी सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर (डीईओ) या पदांवर भरती होईल. रिक्त पदाच्या संपूर्ण तपशिलांसाठी या लिंकवर क्लिक करा.

सिलेक्शन प्रोग्राम

एसएससीद्वारे सीएचएसएल पदासाठी उमेदवारांची निवड तीन स्तरीय परीक्षा घेऊन करण्यात येईल. यामध्ये प्रथम श्रेणी परीक्षेमध्ये 100 गुणांचा मल्टीपल चॉईस पेपर (MCQs) पेपर असेल. यात निवड झालेले उमेदवार टियर-2 परीक्षेत सहभागी होतील. टियर-2 परीक्षा लिखित असेल. यात निवडले जाणाऱ्या उमेदवारांना स्किल टेस्टमध्ये सहभागी व्हावे लागेल. कौशल्य चाचणीनंतर उमेदवारांची निवड अंतिम गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. (CHSL Tier-1 Exam Admit card issued, Download it)

इतर बातम्या

Nora Fatehi | गोल्डन ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा, हॉटनेस पाहून चाहतेही झाले घायाळ!

Aurangabad Lockdown : ‘उद्योजकांना खुश करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय’, इम्तियाज जलील यांचा आंदोलनाचा इशारा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें