CUET UG 2022: दिलासा! ज्यांना 4, 5 आणि 6 ऑगस्टच्या परीक्षेला बसता आलं नाही त्यांना 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या फेज 6 परीक्षेला बसता येणार!

तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेला बसलेले सुमारे 11 हजार विद्यार्थी आता नव्या तारखेला परीक्षा देणार आहेत. यापूर्वी ही परीक्षा 20 ऑगस्टला होणार होती.

CUET UG 2022: दिलासा! ज्यांना 4, 5 आणि 6 ऑगस्टच्या परीक्षेला बसता आलं नाही त्यांना 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या फेज 6 परीक्षेला बसता येणार!
CUET PG Answer KeyImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 1:34 PM

एनटीएने (NTA) सीयूईटी यूजी (CUET UG) परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली आहे. एनटीएने म्हटले आहे की, ज्यांना ४, ५ आणि ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेला बसता आले नाही ते 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या फेज 6 च्या सीयूईटी यूजी परीक्षेला बसू शकतात. या उमेदवारांचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 7, 8 आणि 10 ऑगस्ट रोजी परीक्षा देणारे उमेदवार 21,22 आणि 23 ऑगस्ट रोजी परीक्षा देतील. परीक्षा केंद्रासह नवीन प्रवेशपत्रे17 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. एकूण 3.72 लाख उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत. 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान होणारी ही परीक्षा आता 30ऑगस्टपर्यंत ढकलण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेला बसलेले सुमारे 11 हजार विद्यार्थी आता नव्या तारखेला (New Dates For CUET UG) परीक्षा देणार आहेत. यापूर्वी ही परीक्षा 20 ऑगस्टला होणार होती. मात्र अनेक परीक्षा केंद्रांवरील परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची तपासणी होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत एनटीएने त्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

परीक्षेतील गडबड रोखण्यासाठी एनटीएने ही पावले उचलली आहेत

नुकतंच युजीसीने सीयूईटी परीक्षेबाबत सांगितलं होतं की, आता परीक्षेत कोणताही गोंधळ होणार नाही. गेल्या काही दिवसांतील परीक्षेतील गडबड लक्षात घेता एनटीएने परीक्षेसंदर्भात पावले उचलली आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी एनटीएचे परीक्षा केंद्र करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही यूजीसीने म्हटले होते.

वन नॅशनल वन एन्ट्रन्स एक्झाम

यासोबतच जेईई आणि नीटसारख्या परीक्षांसाठी हीच परीक्षा घेण्याची तयारी करत असल्याचंही यूजीसीने सांगितलं आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकच सीयुईटी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, सध्या त्याची चर्चा सुरू आहे. लवकरच वन नॅशनल वन एन्ट्रन्स एक्झामवर शिक्कामोर्तब होईल, अशी अपेक्षा आहे.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.