Education: एकाच विमानात दोन वैमानिक असतात पण त्यांचा आहार वेगवेगळा असतो, असं का?

Educaion: पण तुम्हाला माहीत आहे का की पायलट आणि को-पायलट यांना विमानात वेगवेगळं जेवण दिलं जातं? जर तुम्हाला यामागचं कारण माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.

Education: एकाच विमानात दोन वैमानिक असतात पण त्यांचा आहार वेगवेगळा असतो, असं का?
Airplane
Image Credit source: सोशल मीडिया
रचना भोंडवे

|

Jul 19, 2022 | 7:27 AM

Education: तुम्ही कधी विमानाने प्रवास केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की विमानात दोन वैमानिक असतात. मुख्य वैमानिक असेल तर सहवैमानिक. विमानात दोन पायलट असण्याचं मुख्य कारण प्रवाशांची सुरक्षा असल्याचं मानलं जातं, पण तुम्हाला माहीत आहे का की पायलट (Pilot) आणि को-पायलट (Co-Pilot) यांना विमानात (Airplane) वेगवेगळं जेवण दिलं जातं? जर तुम्हाला यामागचं कारण माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.

वैमानिकांसाठी जेवणही वेगवेगळ्या ठिकाणी बनवले जाते

चला जाणून घेऊयात की विमान कंपन्या विमान प्रवासादरम्यान आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देतात. ज्याप्रमाणे एका ट्रेनमध्ये दोन मोटरमन असतात आणि दोघांनाही स्वतंत्र सीट असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक विमानात एक पायलट आणि एक को-पायलट असतो. त्यांच्या जागाही वेगवेगळ्या आहेत. जेव्हा जेव्हा वैमानिक आणि सहवैमानिक यांना जेवण दिले जाते, तेव्हा ते कधीही एकसारखे दिले जात नाही. या दोन्ही वैमानिकांसाठी जेवणही वेगवेगळ्या ठिकाणी बनवले जाते. त्यामागे मोठं कारण आहे.

ही खबरदारी लक्षात घेऊन दोन्ही वैमानिकांना वेगवेगळे जेवण

खरेतर दोन्ही वैमानिकांना एकच आहार न देण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे दोन्ही वैमानिकांना समान आहार दिला गेला आणि जेवणात कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर दोन्ही वैमानिकांचे आरोग्य बिघडेल. अशा परिस्थितीत दोन्ही वैमानिकांना उपचारांची गरज भासणार मग अशावेळी विमान कोण उडवणार, हा त्या वेळचा सर्वात मोठा प्रश्न असेल. एकाच वेळी दोन वैमानिकांची प्रकृती बिघडल्यास प्रवाशांची सुरक्षा सर्वाधिक धोक्यात येऊ शकते. अशी समस्या सुटत नाही, त्यामुळे विमान कंपन्या ही खबरदारी लक्षात घेऊन दोन्ही वैमानिकांना वेगवेगळे जेवण देतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें