UPSC NDA Final Result 2021 : एनडीए आणि आयएनए भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, येथे संपूर्ण यादी पहा

UPSC NDA Final Result 2021 : एनडीए आणि आयएनए भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, येथे संपूर्ण यादी पहा (Final results of NDA and INA recruitment exams announced)

UPSC NDA Final Result 2021 : एनडीए आणि आयएनए भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, येथे संपूर्ण यादी पहा
युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी)कडून घेण्यात येणाऱ्या एनडीए आणि आयएनए भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत झालेले सर्व उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन आपला निकाल पाहू शकतात. या परीक्षे अंतर्गत एकूण 418 पदांवर भरती होणार आहे. (Final results of NDA and INA recruitment exams announced)

या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 8 जानेवारी 2021 रोजी सुरू झाली होती. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 28 जानेवारी 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. या रिक्त पदांसाठी प्राथमिक परीक्षा 06 सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती, ज्याचा निकाल 09 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. याच्या मुलाखतीनंतर आता अंतिम निकाल अधिकृत वेबसाईटवर अपलोड केले गेले आहेत.

यूपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेचा अंतिम निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या सुचनांचे अनुसरण करा.

– सर्वात आधी अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जा.
– येथे होम पेज वर What’s New सेक्शनमध्ये जा.
– आता ‘Final Result: National Defence Academy and Naval Academy Examination (I), 2020’ या लिंकवर क्लिक करा.
– यानंतर National Defence Academy and Naval Academy Examination (I), 2020 च्या समोर दिलेल्या पीडीएफच्या लिंक वर क्लिक करा.
– आता आपल्या स्क्रीनवर निकालाची पीडीएफ फाईल उघडेल.
– यामध्ये, आपण आपल्या रोल नंबरच्या मदतीने निकाल पाहू शकता.
– ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.

रिक्त पदे

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) जारी केलेल्या जाहिरातीनुसाक एकूण 418 पदांसाठी भरती होईल. त्यात एनडीएअंतर्गत आर्मीच्या 208, नौदलाच्या 42 आणि एअरफोर्सच्या 120 जागा आहेत. तर आयएनएमध्ये 10 + 2 कॅडेट प्रवेशासाठी 48 पदे निश्चित करण्यात आली आहेत. या पदांवर प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांची यादी वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे.

साईटवर 15 दिवस उपलब्ध असेल निकाल

उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, अंतिम निकाल जाहीर होण्याच्या तारखेपासून अधिकृत पोर्टलवर 15 दिवस वेबसाईटवर उपलब्ध असतील. यानंतर लिंक डिअॅक्टिव्हेट करण्यात येईल. म्हणून उमेदवारांनी काळजीपूर्वक निकालाची पीडीएफ आधी डाऊनलोड करुन ठेवावी. या व्यतिरिक्त, सर्व उमेदवारांना भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या परीक्षेद्वारे भारतीय सैन्यदल आणि नौदलात भरती केली जाते. (Final results of NDA and INA recruitment exams announced)

इतर बातम्या

आर्थिक वर्ष संपण्याआधी झटपट पूर्ण करा ही कामे, अन्यथा भरावा लागेल दंड

15 वर्षापूर्वीचं ट्विट विक्रीला; 2 कोटी रुपये किंमत; वाचा नेमकं प्रकरण काय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI