AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govind Pansare : शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये आले, कॉ. गोविंद पानसरे वृत्तपत्र विक्रेता ते कष्टकऱ्यांचे लढाऊ नेते कसे बनले?

कोल्हापूरमधील (Kolhapur) ज्येष्ठ कामगार नेते आणि राज्यातील कष्टकरी आणि पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक कॉ. गोविंद पानसरे (Govind Pansare) आणि त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 गोळीबार झाला होता.

Govind Pansare : शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये आले, कॉ. गोविंद पानसरे वृत्तपत्र विक्रेता ते कष्टकऱ्यांचे लढाऊ नेते कसे बनले?
कॉ.गोविंद पानसरे
| Updated on: Feb 20, 2022 | 6:54 AM
Share

मुंबई: महाराष्ट्राला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राला (Maharashtra) विचार दिला, नवी दिशा दिली. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रानं हा वारसा जोमानं जपत पुरोगामी राज्य म्हणून ओळख देशभर जपली. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील दांडेकर पुलावर महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. महाराष्ट्र त्या धक्क्यातून सावरत असतानाचं कोल्हापूरमधील (Kolhapur) ज्येष्ठ कामगार नेते आणि राज्यातील कष्टकरी आणि पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक कॉ. गोविंद पानसरे (Govind Pansare) आणि त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015  रोजी गोळीबार झाला. गोविंद पानसरे यामध्ये गंभीर जखमी झाले. तर, उमाताई पानसरे या त्या हल्ल्यातून बचावल्या. हल्लेखोर गोळीबार करुन निघून गेले. गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूरमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना मुंबईला उपचारांसाठी हलवण्यात आलं. मुंबईला उपचारादरम्यान त्यांचं 20 फेब्रुवारी 2015 रोजी निधन झालं.

वृत्तपत्र विक्रेता ते वकील, कामगार नेते

विद्यार्थी दशेत असताना गोविंद पानसरे अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हार गावातून शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये आले. कोल्हापूर हीच त्यांनी कर्मभूमी मानून काम सुरु केलं होतं. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून गोविंद पानसरे यांनी सुरुवातीला वृत्तपत्र विकण्याचं काम केलं.कोल्हापूरमध्येच गोविंद पानसरे यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. नगरपालिकेत शिपाई, शिक्षक, त्यानंतर शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून देखील काम केलं. गोविंद पानसरे यांनी कामगारांच्या हक्काच्या प्रश्नी वकिली देखील केली.

भाकपमधून राजकीय काम

महाराष्ट्राच्या राजकारणात आपण सध्या पक्षातरांचा वातावरण फार दिसतं. गोविंद पानसरे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात काम केलं. ते पक्षात विविध पदांवर काम करत होते. पक्षाच्या माध्यमातून कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी त्यांनी लढा उभारला. कामगार, शेतकरी, वीजदर वाढीविरोधातील आंदोलन यामध्ये ते सक्रिय असायचे. कोल्हापूरमधील गाजलेल्या टोल विरोधी आंदोलनात देखील ते सहभागी होते.

महाराष्ट्रातील चळवळींचे मार्गदर्शक

गोविंद पानसरे यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनचा सामाजिक आणि राजकीय घटना पाहिल्या होत्या. राज्यातील कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या विविध संघटना मार्गर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असतं.

शिवाजी कोण होता?

कॉ. गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राशी इमान राखणार सोप्या शब्दात अगदी सामान्य माणसाला कळेल, असं पुस्तक लिहिलं. शिवाजी कोण होता? हे त्या पुस्तकाचं नाव आहे. शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या असून विविध भाषांमध्ये भाषांतरीत देखील झालं आहे. या पुस्तकानं छत्रपती शिवाजी महाराज यांचं लोककल्याणकारी आणि वास्तवावादी चित्रण मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गोविंद पानसरे यांनी या शिवाय इतर पुस्तकांचे देखील लेखन केलं आहे.

इतर बातम्या:

Rice Export : बासमती तांदळाचा सुगंधही दरवळला अन् दरही वाढला, काय आहेत कारणे?

तुम्हाला माहित आहे का वारसाहक्कात संपत्तीसोबतच कर्जही मिळते; जाणून घ्या कोणकोणत्या कर्जाची परतफेड करावी लागू शकते

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.