ICAI CA Exam: आयसीएआयच्या डिसेंबर सत्रातील सीए परीक्षांसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीएच्या विविध डिसेंबर महिन्यातील विविध परीक्षासांठी नोंदणीप्रक्रिया सुरु केली आहे.

ICAI CA Exam: आयसीएआयच्या डिसेंबर सत्रातील सीए परीक्षांसाठी नोंदणी सुरु,  रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स
आयसीएआय
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 3:58 PM

ICAI CA December Exam नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीएच्या विविध डिसेंबर महिन्यातील विविध परीक्षासांठी नोंदणीप्रक्रिया सुरु केली आहे. डिसेंबर महिन्यातील परीक्षांसाठी नोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे ते icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करु शकतात. 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात. मात्र, त्यांना विलंब शुल्क 600 रुपये भरावं लागेल.

कोणत्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना अर्ज करता येणार?

आयसीएआयनं दिलेल्या माहितीनुसार चार्टर्ड अकाऊँटंटस फायनल, इंटमिजिएट, इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट, टेक्निकल एक्झामिनेशन, इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट या परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान आहे.

ICAI CA डिसेंबर सत्रातील परीक्षेसाठी नोंदणी कशी करायची?

स्टेप 1: ICAI CA च्या डिसेंबर मधील सत्राच्या परीक्षेला अर्ज करायचा असल्यास प्रथम आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.in या वेबसाईटला भेट द्या. स्टेप 2:तिथे परीक्षार्थी नोंदणीवर क्लिक करा. स्टेप 3:विद्यार्थ्यांनी अर्जातील सर्व माहिती अचूकपणे सादर करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. स्टेप 4: परीक्षा फी जमा करावी आणि त्यानंतर अर्ज दाखल करावा. स्टेप 5:अर्ज डाऊनलोडकरुन त्याची प्रिंटआऊट सोबत ठेवावी. स्टेप 6:परीक्षेची फी भरण्यासाठी यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा वापर करावा.

सीए परीक्षा नोंदणी फी

इच्छुक उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाईट icaiexams.icai.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय केंद्रांतील उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 रुपये आणि विलंब शुल्क 600 रुपये भरावे लागतील. काठमांडू वगळता इतर परदेशी केंद्रांसाठी फी 325 अमेरिकी डॉलर आणि विलंब शुल्क 10 अमेरिकन डॉलर आहे.

ICAI कडून या विद्यार्थ्यांची फी माफ

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियाकडून ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणू संसर्गानं त्यांचे आई वडिल गमावले आहेत त्यांना फीमध्ये सूट देण्यात आली आहे. आसीएआयकडून घेण्यात येणाऱ्या सर्व स्तरातील परीक्षांसाठी फी माफ करण्यात आली आहे. विद्यार्थी ICAI च्या वेबसाईटवर यासंबंधी नोटिफिकेशन पाहू शकतात. याचा कालावधी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2023 पर्यंत मर्यादित राहिल.

सीएच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी आयसीएआयची स्थापना

आयसीएआय ही एक वैधानिक संस्था आहे. ही संस्था देशातील चार्टर्ड अकाउंटन्सीच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी 1949 मधील सनदी लेखाकार कायद्याखाली स्थापन करण्यात आली होती. सध्या या संस्थेचे 3 लाखांहून अधिक सदस्य आहेत. सीए शिक्षणामध्ये उच्चतम दर्जा राखण्याची जबाबदारी आयसीएआयवर आहे. ज्या विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय करायचा असेल, त्याने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा दिल्यानंतर आयसीएआयच्या फाऊंडेशन कोर्ससाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

इतर बातम्या:

ICAI CA May Exam 2021: मे महिन्यातील सीए परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

ICAI CA Foundation June 2021: जून महिन्यातील सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

ICAI CA Exam Application for november december session starts from today check details here

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.