ICAI CA Foundation Exam 2021: सीए फाऊंडेशनच्या परीक्षा लांबणीवर, आयसीएआयकडून नव्या तारखेची घोषणा

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया नं सीए फाऊंडेशन परिक्षेसदंरभात मोठा निर्णय घेतला आहे. ICAI CA foundation exam

ICAI CA Foundation Exam 2021: सीए फाऊंडेशनच्या परीक्षा  लांबणीवर, आयसीएआयकडून नव्या तारखेची घोषणा
ICAI CA

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया नं सीए फाऊंडेशन परिक्षेसदंरभात मोठा निर्णय घेतला आहे. फाऊंडेशन परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेलाय. आयसीएआयनं जारी केलेल्या पत्रकानुसार परीक्षा 24 जुलै रोजी आयोजित करण्यात येईल. (ICAI decided to postpone CA foundation exam till 24th July)

आयसीएआयने जारी केलेल्या नोटीसमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सीए फाउंडेशनची परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली गेली आहे. याशिवाय परीक्षेविषयी नवीन वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर अपलोड केलं जाईल, असे देखील सांगण्यात आलं आहे. सीएच्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आयसीएआयच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन नोटिफिकेशन पाहू शकता.

परीक्षा रद्द करण्याची मागणी

सीए फाउंडेशन परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर मोहीम चालवली होती. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी #caexam याद्वारे ट्विटरवर मोहीम सुरू केली होती. या सर्व विद्यार्थ्यांनी आयसीएआय परीक्षेसाठी आणखी एक संधी द्यावी, अशी देखील मागणी केली आहे. आयसीएआयनं फाउंडेशन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 24 जून पासून घेण्यात येणार होती.

इंटर आणि फायनल परीक्षा स्थगित करण्याची मागणी

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंटर आणि फायनल परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी देखील करण्यात येत आहे. इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षा 5 जुलै 2021 पासून सुरू होणार आहे. आयसीएआयचे मेंबर धीरज खंडेलवाल यांनी शनिवारी ट्विट करून परीक्षेसंदर्भात माहिती दिली. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता योग्य निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

ICAI CA Result 2020: सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल

मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडीसाठी नाशिकमध्ये बैठक, माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची साहित्यविश्वात चर्चा

(ICAI decided to postpone CA foundation exam till 24th July)