मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडीसाठी नाशिकमध्ये बैठक, माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची साहित्यविश्वात चर्चा

खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची 24 तारखेला होणार निवड होणार आहे. ही माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी दिली. (marathi Sahitya Sammelan President)

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 9:03 AM, 9 Jan 2021
मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडीसाठी नाशिकमध्ये बैठक, माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची साहित्यविश्वात चर्चा

औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची 24 जानेवारीला निवड होणार आहे. ही माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. साहित्य महामंडळाच्या नाशिक येथील बैठकीत ही निवड केली जाईल. दरम्यान, साहित्य संमेलनाच्या ठिकाणावून वाद सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा संमेलन अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार यावरुन चर्चा रंगली आहे. (announcement of the President of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan will be held on the 24th. january)

संमेलनाध्यक्षाची 24 जानेवारीला घोषणा

दरवर्षीप्रमाणे यंदाही यंदा 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होणार याची अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. अध्यक्षांच्या निवडीसाठी नाशिक येथे 24 जानेवारी रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या संमेलन अध्यक्षांची निवड होईल. मागील वर्षीच्.या 93 व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सीस दिब्रिटो हे होते. त्यावेळी दिब्रिटो यांच्या निवडीवर वाद निर्माण झाला होता.

साहित्य संमेलन स्थळावरुन नवा वाद

मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी (8 जानेवारी) औरंगाबादमध्ये साहित्य संमेलनाची घोषणा केली. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होईल, असे ठाले-पाटील यांनी सांगितले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची घोषणा 24 जानेवारी होईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आलं.

यंदा कोरोनामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याने साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार, अशी घोषणा करण्यात आली.

दरम्यान कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील सेलू, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, नाशिक आणि पुण्याच्या सरहद संस्थेकडून नवी दिल्लीत संमेलन घ्यावे, असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र दिल्लीत कोरोनाचा कहर सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर सेलू आणि अमळनेर येथील आयोजक संस्थांनी दिल्लीत साहित्य संमेलन भरवण्याबाबत शंका उपस्थित केली होती.

याशिवाय पुण्याच्या सरहद या संस्थेनेही दिल्लीत कोरोनामुळे साहित्य संमेलन आयोजित करत नसल्याचं कळवलं असल्याचं ठाले पाटील यांनी सांगितले होते. त्यामुळे यंदाचे साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या साहित्य संमेलनाचं आयोजकत्व नाशिकच्या लोकहितवादी संस्थेकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर संमेनल नेमके कोठे घ्यावे यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

संबधित बातम्या :

साहित्य संमेलन स्थळावरुन नवा वाद; कौतिकराव ठाले पाटलांच्या विधानाचा प्रतिवाद

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

(announcement of the President of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan will be held on the 24th. january)