ICSI CS June Result 2021 Date: आयसीएसआयच्या सीएस परीक्षेच्या जून सत्राचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकाल कसा पाहायचा?

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ने ICSI CS जून सत्राच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. कार्यकारी आणि व्यावसायिक कार्यक्रमासाठी CS परीक्षा 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली.

ICSI CS June Result 2021 Date: आयसीएसआयच्या सीएस परीक्षेच्या जून सत्राचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकाल कसा पाहायचा?
ICSI
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 4:42 PM

ICSI CS June Result 2021 Date नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ने ICSI CS जून सत्राच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. व्यावसायिक, कार्यकारी (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) आणि फाऊंडेशन प्रोग्रामचा निकाल 13 ऑक्टोबर 2021 रोजी एकाचवेळी जाहीर केला जाईल. तिन्ही अभ्यासक्रमांचा निकाल ICSI च्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाहीर केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते वरील वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचा निकाल तपासू शकतात. आयसीएसआयनं जारी केलेल्या नोटीसनुसार, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल. त्याचबरोबर कार्यकारी अभ्यासक्रमाचा निकाल दुपारी 2 वाजता आणि फाऊंडेशन अभ्यासक्रमाचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होईल.

एक्झिक्युटिव्ह आणि फाऊंडेशन कोर्सचे ई-रिझल्ट वेबसाईटवर लगेच अपलोड केले जातील. प्रोफेशनल कोर्सचा रिझल्ट आणि मार्कांचा तपशील उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवला जाईल. सीएस फाउंडेशन कार्यक्रमाची परीक्षा 13 आणि 14 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. कार्यकारी आणि व्यावसायिक कार्यक्रमासाठी CS परीक्षा 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली.

निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1: उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.icsi.edu ला भेट द्यावी स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा स्टेप 3: नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर नोंदवून लॉगीन करा स्टेप 4: यानंतर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल स्टेप 5: निकाल डाऊलनोड करुन प्रिंट आऊट घ्या.

जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर

संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) प्रगत 2021 साठी प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. जेईई प्रगत परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर अपलोड करण्यात आलं आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत ते फक्त या संकेतस्थळावरून त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतील. परीक्षेचे हे प्रवेशपत्र (IIT JEE Admit Card 2021) परीक्षेच्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत डाऊनलोड करता येईल. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर आणि नियोजन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाईल. आम्ही तुम्हाला सांगू की फक्त तेच विद्यार्थी IIT JEE परीक्षेत भाग घेतात ज्यांची रँक JEE Main मध्ये 2.5 लाखांच्या आत येते.

अडीच लाख विद्यार्थी सहभागी होतील

जेईई मेन 2021 परीक्षा उत्तीर्ण करणारे 2.5 लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 परीक्षेसाठी पात्र असतील. देशातील आयआयटी संस्थातील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. परीक्षेपासून निकालापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

इतर बातम्या:

NEET SS 2021: नीट सुपरस्पेशालिटीच्या पॅटर्न बदल, डॉक्टरांच्या जीवाशी खेळू नका, सुप्रीम कोर्टानं केंद्रासहीत एनबीईला फटकारलं

UGC NET 2021 Admit Card: नेट परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड कसं करायचं? 6 ऑक्टोबरपासून परीक्षेला सुरुवात

ICSI CS June Result 2021 Date released for all courses check details here how to download result

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.