Independence Day 2021: सैनिक स्कूलमध्ये मुलींना प्रवेश मिळणार, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक घोषणा केल्या. नरेंद्र मोदींनी शिक्षण क्षेत्रा संदर्भात एक मोठा निर्णय घेतल्याचं जाहीर केलेय. देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

Independence Day 2021: सैनिक स्कूलमध्ये मुलींना प्रवेश मिळणार, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
Narendra Modi
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 10:59 AM

Independence Day 2021 नवी दिल्ली: भारत आज आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक घोषणा केल्या. नरेंद्र मोदींनी शिक्षण क्षेत्रा संदर्भात एक मोठा निर्णय घेतल्याचं जाहीर केलेय. देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

“आज मी देशवासियांसोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करत आहे. देशातील लाखो मुलींकडून संदेश येत असत की त्यांनाही सैनिक शाळेत शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठीही सैनिक शाळांचे दरवाजे उघडले पाहिजेत, या दृष्टीनं देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश घेता येईल, असं मोदी म्हणाले. अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिक शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय झाला होता.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नवीन शिक्षण धोरणावर देखील भाष्य केलं. नवीन शिक्षण धोरण दारिद्र्याविरुद्ध लढण्यासाठी बनवण्यात आले आहे. भाषेच्या अडचणीमुळे अनेकांची प्रतिभा पिंजऱ्यात बांधली गेली. 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करण्यासाठी आज देशाकडे नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ आहे. “जेव्हा गरीबांची मुलगी, गरीबांचा मुलगा मातृभाषेत शिक्षण घेऊन व्यावसायिक होईल, तेव्हा त्यांच्या क्षमतेला न्याय मिळेल. मी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे दारिद्र्याविरुद्धच्या लढाईचे एक साधन मानतो”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

75 वंदे भारत ट्रेन्सची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणावेळी देशभरात वंदे भारत ट्रेन्स सुरु करण्याची घोषणा केली. त्यानुसार येत्या 75 आठवड्यात रेल्वे विभागाकडून 75 वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येतील. या ट्रेन्स भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन संपूर्ण देश जोडतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

उत्पादनक्षमता आणि निर्यात वाढवण्याची गरज

आगामी काळात देशाचा विकास करायचा असेल तर उत्पादन क्षमता आणि निर्यात वाढवावी लागेल. भारतातील उत्पादकांनी त्यांचे उत्पादन भारताची ओळख असल्याचं लक्षात ठेवावं. जगाच्या बाजारपेठेवर आपलं अधिराज्य असावं हे स्वप्न देशातील उत्पादकांनी पाहावं. सरकार त्यांच्यासोबत ठामपणे उभे असेल, असेही मोदींनी सांगितले.

इतर बातम्या:

Independence Day 2021 : ITBP च्या जवानांकडून थेट लडाखमधील पँगोंग त्सोच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्योत्सव

PM Modi Speech : लाल किल्ल्यावरील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे

Independence Day 2021 PM Modi said now Girls will also study in Sainik Schools across the nation

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.