ITI Admissions: पहिल्या फेरीत 40 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश! सरकारी आयटीआयला सर्वाधिक पसंती

कमी खर्चात प्रात्यक्षिकांवर आधारित रोजगाराभिमुख शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असल्याने, विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी पसंती दर्शवली आहे.

ITI Admissions: पहिल्या फेरीत 40 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश! सरकारी आयटीआयला सर्वाधिक पसंती
ITI admissionsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 9:14 AM

पुणे: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) पहिल्या फेरीतून 40 हजार 710 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, सरकारी आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) देण्यात आली आहे. डीव्हीटीकडून राज्यातील सरकारी आणि खासगी अशा एकूण 975 आयटीआयमध्ये उपलब्ध असणाऱ्या 1 लाख 35 हजार 773 जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी 2 लाख 48 हजार 796 विद्याथ्र्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानुसार, पहिल्या फेरीत 92 हजार 140 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत अॅलॉटमेंट जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी 40 हजार 710 विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यातील 31 हजार 473 विद्यार्थ्यांनी सरकारी आयटीआयमध्ये, तर उर्वरित 9 हजार 237 विद्यार्थ्यांनी खासगी आयटीआयमध्ये प्रवेश (ITI Admissions) निश्चित केले आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ईलेक्ट्रिशियन फिटर, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, मॅकेनिकल डिझेल अशा पहिल्या पाच ट्रेडमध्ये प्रवेश घेण्याला पसंती दर्शवली आहे. दुसऱ्या फेरीसाठी आयटीआयचे पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया बुधवारपर्यंत सुरू होती. आता फेरीसाठी प्रवेश यादी शनिवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे डीव्हीईटीकडून सांगण्यात आले आहे. कमी खर्चात प्रात्यक्षिकांवर आधारित रोजगाराभिमुख शिक्षण (Education) घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असल्याने, विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी पसंती दर्शवली आहे. दरम्यान, नव्या प्रवेशांसाठी 27 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी डीव्हीटीच्या https://admission.dvet.gov. in/ वेबसाइटवर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभागस्तरीय पुरस्कार

● नागपूर विभाग- अंबुजा अशासकीय औ. प्र. संस्था, गडचांदूर, जि. चंद्रपूर, औरंगाबाद विभाग शासकीय औ. प्र. संस्था, बदनापूर, जि. जालना

● पुणे विभाग- स्मॅक संचलित स्व. जवानमलजी गांधी खासगी औ. प्र. संस्था, कोल्हापूर

● नाशिक विभाग- लोकपंचायत रूरल टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे खासगी – नाशिक विभाग औ. प्र. संस्था, कुरकुंडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर

●  मुंबई विभाग शासकीय औ. प्र. संस्था, ठाणे

● अमरावती विभाग शासकीय औ. प्र. संस्था, अमरावती, जि. अमरावती

नाशिक विभाग प्रथम

राज्यातील खासगी तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) पाहणी करून त्यांना उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार दिला जातो. यात यंदा नाशिक विभागाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मुंबई विभाग दुसऱ्या स्थानावर तर नागपूर विभाग तिसऱ्या स्थानावर आहे. उद्योग क्षेत्रातील विविध कामांसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे आणि त्यासाठी युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे तसेच कौशल्ययुक्त प्रशिक्षण घेऊन उत्पादन व इतर सेवा क्षेत्रामध्ये स्वयंरोजगारा साठी सक्षम बनविणे, कामगारांना योजनाबद्ध प्रशिक्षण देऊन औद्योगिक आस्थापनांचा दर्जा, गुणवत्ता व उत्पादन वाढवणे या उद्दिष्टांसह राज्यातील शिल्प कारागीर योजना सुरू करणे या सर्व प्रशिक्षण योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर सर्व संस्थामध्ये निकोप स्पर्धा घेऊन उत्कृष्टतेकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. यासाठी पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरस्कारासाठी राज्यस्तरीय तीन आणि प्रत्येक विभागातून एक अशा एकूण नऊ संस्थाची निवड करण्यात आली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.