JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार, रमेश पोखरियाल यांची माहिती, कुठे पाहाल रिझल्ट?

JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षा फेब्रुवारी सत्राचा निकाल थोड्याच वेळात जाहीर केला जाणार आहे. (JEE Main 2021 Result)

JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार, रमेश पोखरियाल यांची माहिती, कुठे पाहाल रिझल्ट?
जाणून घ्या जेईई मेनचा निकाल कधी येणार, अशा प्रकारे तपासू शकाल

JEE Main 2021 Result नवी दिल्ली : अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेच्या फेब्रुवारी सत्राचा निकाल (JEE Main 2021 Result) काही तांसामध्ये जाहीर केला जाईल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे. जेईई मेन फेब्रुवारी सत्राच्या jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. (JEE Main 2021 Result will declared soon tweet by Ramesh Pokhriyal Nishank)

6 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

जेईई मेन फेज-1 (JEE Main 2021) ही परीक्षा 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला घेण्यात आली. देशातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये देशभरातील 6 लाख 61 हजार 776 विद्यार्थी बसले होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार 95 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

काही दिवसांपूर्वी जेईईकडून JEE Main Final Answer Key जारी केली आहे. ही Answer Key या jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटवर ही Answer Key चेक आणि डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.

JEE Main February Result कसे कराल चेक?

Step 1 : विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईट वर जा. Step 2 : या वेबसाईटवर JEE Main Feb Result या ऑप्शनवर क्लिक करा. Step 3 : त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा. Step 4 : यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल Step 5 : निकाल तपासा Step 6 : त्यानंतर प्रिंट काढा.

जेईई मेन परीक्षा ही 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड घेण्यात आली होती. देशभरातील विविध केंद्रांवर जेईई मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 95 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. ही परीक्षा प्रथमच आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा 13 भाषांमध्ये घेण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

JEE Main 2021: परीक्षेसाठी नोंदणीची उद्या अंतिम तारीख, लवकर करा अर्ज

JEE Main 2021 फेब्रुवारी सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, ‘या’ दिवशी निकाल जाहीर होणार

(JEE Main 2021 Result will declared soon tweet by Ramesh Pokhriyal Nishank)

Published On - 7:00 pm, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI