जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला मिळाला 100 टक्के एनटीए स्कोअर
JEE Main Result 2025 : जेईई मेन सेशन 1 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, जो अधिकृत वेबसाईटवर तपासता येऊ शकतो. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या सांगण्यानुसार, या परीक्षेत एकूण 14 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याचाही समावेश आहे.

जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील तब्बल 12 लाख 58 हजार 136 विद्यार्थ्यांनी ‘जेईई मेन 2025’ ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार JEE Main या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. NTA नुसार, JEE Mains 2025 सत्र 1 मध्ये एकूण 14 उमेदवारांनी 100 पर्सेंटाइल मिळवले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्याचाही समावेश आहे. विशाद जैन असे त्याचे नाव असून त्याला 100 एनटीए स्कोअर मिळाला आहे. देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये बी.ई आणि बी.टेक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा 22, 23, 24, 28 आणि 29 जानेवारी दरम्यान 304 शहरांमधील 618 केंद्रांवर घेण्यात आली
JEE Main Result 2025: कसा चेक कराल रिझल्ट ?
सर्वात पहिले jeemain.nta.nic.in या जेईई मेनच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
त्यानंतर सेशन 1 स्कोअरकार्ड डाऊनलोड लिंक उघडा.
तेथे तुमचा रिझल्ट चेक करून घ्या आणि तो डाऊनलोड करा.
100 पर्सेंटाइल मिळवणारे विद्यार्थी
विशाद जैन (महाराष्ट्र) आयुष सिंघल (राजस्थान) कुशाग्र गुप्ता (कर्नाटक) दक्ष (दिल्ली) हर्ष झा (दिल्ली) रजित गुप्ता (राजस्थान) श्रेयल लोहिया (उत्तर प्रदेश) सक्षम जिंदल (राजस्थान) सौरव (उत्तर प्रदेश) अर्णव सिंह (राजस्थान) शिवेन विकास तोषनीवाल (गुजरात) साई मनोग्ना गुथिकोंडा (आंध्र प्रदेश) ओम प्रकाश बेहरा (राजस्थान) बानी ब्रता माजी (तेलंगना)
JEE Main 2025 Result : 39 उमेदवारांचे गुण जाहीर झाले नाहीत
NTA नुसार, एकूण 39 उमेदवारांचे गुण जाहीर केले गेले नाहीत कारण ते फसवणूक किंवा अनुचित व्यवहारात गुंतलेले आढळले होते. . JEE मुख्य सत्र 1 च्या पेपर 1 च्या परीक्षेसाठी एकूण 13,11,544 उमेदवारांनी नोंदणी केली होती, परंतु केवळ 12,58,136 उमेदवार परीक्षेला बसले होते.
JEE Main 2025 Exam: कधी झाली परीक्षा ?
NTA ने JEE मुख्य सत्र 1 पेपर 1 (BE/B.Tech) परीक्षा 22, 23, 24, 28 आणि 29 जानेवारी रोजी घेतली होती. सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 अशा दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. तर, पेपर 2 ची परीक्षा (B.Arch/B.Planning) 30 जानेवारी रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये (दुपारी 3 ते 6:30 या वेळेत) घेण्यात आली.