JEE Mains 2022: जेईई मेन परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल, नव्या तारखा जाहीर

जेईई मेन परीक्षा 2022 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. जेईई मेन परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

JEE Mains 2022: जेईई मेन परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल, नव्या तारखा जाहीर
जेईई मेन परीक्षा Image Credit source: JEE NTA
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 3:36 PM

नवी दिल्ली : जेईई मेन परीक्षा 2022 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. जेईई मेन परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यासंदर्भात नोटीस जारी केलं आहे. या नोटीसनुसार यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्रातील परीक्षा आता पाच दिवस लांबणीवर टाकऱण्यात आल्या आहेत. आता परीक्षा 21 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या जेईई मेन परीक्षा 2022 च्या वेबसाईटवर जाऊन यासंदर्भातील अधिक माहिती मिळवता येईल. यापूर्वीच्या वेळापत्रका प्रमाणं जेईई मेन परीक्षा 16, 17, 18, 19, 20 21 एप्रिलला होणार होत्या. आता परीक्षा 21 एप्रिल पासून सुरु होणार आहे. नव्या तारखांनुसार परीक्षा 21, 24, 25, 29 एप्रिल 2022 आणि 01 आणि 04 मे 2022 होणार आहे.

जेईई प्रवेश पत्र कधी मिळणार?

जेईई मेन परीक्षा 2022 च्या एप्रिल सत्रातील परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. आता जेईई मेन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रवेशपत्र एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मिळतील. परीक्षांसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांची यादी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जारी केली जातील. विद्यार्थ्यांनी jeemain.nta.nic.in या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांच्या मागणीवरुन बदल

एनटीएनं परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करताना जेईई मेन 2022 च्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीमुळं हा निर्णय घेतला आहे. जेईई मेन्स परीक्षा आणि बोर्ड परीक्षांच्या तारखा एकत्रित येत असल्यानं विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या तारखा बदलण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन विद्यार्थ्यांनी आता नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.

सध्या जेईई मेन एप्रिल परीक्षा 2022 साठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जेईई मेन परीक्षेचा अर्ज दाखल करताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं आहे. अर्ज दाखल करताना काही चूक झाल्यास दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार नाही, अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे. जेईई मेन 2022 लेटेस्ट अपडेटस साठी अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर भेट देऊ शकतात. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी एनटीएन जारी केलेल्या वेबसाईटवर भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

VIDEO: मोदी लोकसभेत येताच ‘मोदी… मोदी’च्या घोषणा; भाजप खासदारांकडून पंतप्रधानांचं अनोखं स्वागत

आकाश, किरणच्या आत्महत्येचा एकमेकांशी काय संबंध? गळफास घेत आयुष्य संपवलं! नागपुरात खळबळ

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.