AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : अजित पवार यांनी अखेरच्या कॉलमध्ये उल्लेख केला ते दिगंबर दुर्गाडे कोण ? नाव समोर येताच म्हणाले..

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानातून शेवटचा कॉल केला होता, त्याचं रेकॉर्डिंग समोर आलं आहे. त्या शेवटच्या फोन कॉल मध्ये अजित पवार यांनी "आम्ही सर्वांना न्याय देऊ," असं म्हटलं होतं. त्याच कॉलमध्ये अजित पवार यांच्या तोंडी दिगंबर दुर्गाडे यांचा उल्लेख आला होता. कोण आहे ते दिगंबर दुर्गाडे ? जाणून घेऊया सविस्तर..

Ajit Pawar : अजित पवार यांनी अखेरच्या कॉलमध्ये उल्लेख केला ते दिगंबर दुर्गाडे कोण ? नाव समोर येताच म्हणाले..
अजित पवार यांच्या कॉलमध्ये दिगंबर दुर्गाडे यांचा उल्लेख
| Updated on: Feb 05, 2026 | 10:49 AM
Share

राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गेल्या आठवड्यात ( 28 जानेवारी) विमान अपघातात निधन झालं. ते काही सभांसाठी विमानाने मुंबईहून बारामतील जात होते, तेव्हाच बारामतीजवळ त्यांचं विमान आल्यावर लँडिंगवेळी ते अचानक क्रॅश झालं आणि स्फोट झाला. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विमानातील एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र हे विमान कोसळण्यापूर्वी, प्रवासात असतानाहीअजित पवार कामात होते. त्याचदरम्याान त्यांनी एक कॉल केला होता, तो त्यांचा शेवटचा कॉल ठरला. नुकतीच बारामती पक्ष कार्यालयात अजित दादांची शेवटची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. ती ऐकताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.

काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी अजित दादांशी संवाद साधला होता, दादांशी काय बोलणं झालं ते त्यांनी सविस्तर सांगितलं होतं. या संभाषणात अजित पवार यांना असलेली कामाची ओढ आणि सर्वसमावेशकता हे दिसू आलं. याच संभाषणात त्यांनी बोलता बोलता दिगंबर दुर्गाडे यांचा उल्लेख केला होता. अजित दादांनी दिगंबर दुर्गाडे यांचं नाव घेतलं. श्रीजीत यांच्याशी बोलतान अजित दादांचं पूर्ण संभाषण काय झालं, तसेच दादांनी ज्यांचं नाव घेकलं त्या दिगंबर दुर्गाडे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

कोण आहेत दिगंबर दुर्गाडे ?

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. दिगंबर दुर्गाडे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुरंदरचे अध्यक्ष आहेत. ते पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावचे रहिवासी असल्याचं समजतं. श्रीजित यांच्याशी बोलताना अजित पवारांनी दिगंबर दुर्गाडे यांचा उल्लेख केला होता. दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यांना अनेक वर्षांनंतर संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन मी स्वतः केलं आहे. आम्ही राजकारण करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो, असं अजित पवार म्हणाले होते.

दिगंबर दुर्गाडे यांची प्रतिक्रिया काय ?

अजित पवारांच्या शेवटचं संभाषण व्हायरल झाल्यानंतर आणि त्यात नाव आल्यानंतर दिगंबर दुर्गाडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ” दिवंगत उपमुख्यमंत्री, अजित पवार यांचा (Ajit Pawar) शेवटचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला, त्यांचं रेकॉर्डिंग चर्चेत आलं. त्याबद्दल मला अनेक जणांनी (मला) प्रतिक्रिया विचारली. त्याचा रेफरन्स म्हणजे,बारामती किंवा तिकडच्या एखाद्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या किंवा पंचायत समितीच्या तिकीटीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना समजावून सांगताना दादांनी तो उल्लेख केला असेल, असं मला वाटतंय”, असं दुर्गाडे म्हणाले.

” खरंतर दादांसारखा मोठा नेता,माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांना तो मेसेज द्यायचा होता. अजितदादा महाराष्ट्राचे फार मोठे व्यक्तीमत्व होते, त्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. आपण पाहिलं की राज ठाकरे साहेब जेखील त्यांच्या देखील त्यांच्याबद्दल म्हणाले होते की, अजित पवार आणि माझ्यात काही मतभेद असतील. पण हा माणूस जात-पात मानणारा नव्हता, तो जातीपलीकडे जाणारा माणूस होता. हे त्यांचं स्टेटमेंट होतं. मला वाटतं त्या कॉल रेकॉर्डिंगमधून दादा तोच विचार त्या कॉल रेकॉर्डमधून कार्यकर्त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करत होते. जात पात मानणारा मी नाही असं दिसून आलं असंही ते पुढे म्हणाले” असं दुर्गाडे यांनी सांगितलं.

” माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दादांनी जिल्हा बँकेवर इतकी वर्ष संधी दिली. पहिलं तिकीट अजित दादांनीच दिलं होतं. 1997 साली पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे तिकीट मला दिलं होतं. आणि आज माझ्या मुलीलासुद्धा शेवटचं तिकीट त्यांनी दिलं आहे. दादांनी शेवटचे हे तिकीट जिल्ह्याला नव्हे, तर महाराष्ट्राला दिलं आहे. दादांना खरी श्रद्धांजली म्हणून, हे निवडून आणावं. दादा आता नाहीत. मात्र दादा सगळ्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जात होते, हे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सगळेजण तेच सगळे विसरून काम करू”, असंही दुर्गाडे म्हणाले.

काय होता अजित पवार आणि श्रीजीत पवार यांचा संवाद ?

अजित पवार: अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यांना अनेक वर्षांनंतर संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन मी स्वतः केलं आहे. तुम्हाला अनेकदा वस्तुस्थिती माहिती नसते आणि तुम्ही काहीही बोलता. आम्ही राजकारण करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो, हे लक्षात घे.

श्रीजीत पवार: दादा, मला जे वाटलं ते मी बोललो.

अजित पवार: तुझं म्हणणं मान्य आहे, पण वस्तुस्थिती समजून घे. आताही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून मी माळी समाजाला उमेदवारी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही, पण आपण समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतोय.

श्रीजीत पवार: ठीक आहे दादा, तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो अंतिम निर्णय आहे, मी फोन ठेवतो. धन्यवाद!

असा संवाद अजित पवार आणि श्रीजित यांच्यात झाला. त्यानंतर काहीच वेळात विमान कोसळलं आणि अजित पवार यांचं निधन झालं.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश