VIDEO: मोदी लोकसभेत येताच ‘मोदी… मोदी’च्या घोषणा; भाजप खासदारांकडून पंतप्रधानांचं अनोखं स्वागत

चार राज्यातील निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळालं आहे. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा देशभर जल्लोष पाहायला मिळत आहे. लोकसभेतही या जल्लोषाची एक झलक पाहायला मिळाली.

VIDEO: मोदी लोकसभेत येताच 'मोदी... मोदी'च्या घोषणा; भाजप खासदारांकडून पंतप्रधानांचं अनोखं स्वागत
भाजप खासदारांकडून पंतप्रधानांचं अनोखं स्वागतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 3:01 PM

नवी दिल्ली: चार राज्यातील निवडणुकीत भाजपला (bjp) दणदणीत यश मिळालं आहे. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा देशभर जल्लोष पाहायला मिळत आहे. लोकसभेतही (loksabha) या जल्लोषाची एक झलक पाहायला मिळाली. आज संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) लोकसभेत आले. मोदी लोकसभेत येताच भाजप नेते अमित शहा, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे सर्वच खासदार उभे राहिले. या खासदारांनी मोदींचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतानाच ‘मोदी… मोदी’चे नारे लगावले. यावेळी ‘भारत माता की जय’च्याही घोषणा देण्यात आल्या. मोदी आसनावर बसल्यानंतरही भाजप खासदारांकडून बाके वाजवत मोदी मोदीच्या घोषणा दिल्या जात होत्या. बराचवेळ संपूर्ण सभागृहात या घोषणा सुरू होत्या. त्यामुळे सभागृहाचं कामकाज काहीकाळ थांबलं होतं.

चार राज्यांच्या विधानसभा निकालानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आले. पाच राज्यांपैकी भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत आले. यावेळी सभागृहात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर विरोधी पक्षनेते उपस्थित होते. मोदी आल्यानंतर सर्वच खासदार उठून उभे राहिले. भाजपच्या खासदारांनी मोदींचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. त्यानंतर मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. यावेळी मोदींनी सर्वांना अभिवादन केले आणि आपल्या स्थानावर बसले. त्यानंतरही मोदी मोदी आणि वंदे मातरमचा गजर सुरूच होता. बराच काळ सभागृहात या घोषणा सुरू होत्या.

ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळ अवाक्

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला हे ऑस्ट्रेलियाच्या एका शिष्टमंडळा विषयी बोलत होते. हे शिष्टमंडळ सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी आलं होतं. त्याचवेळी मोदींनी सभागृहात प्रवेश केला. मोदींचं अशा पद्धतीचं झालेलं स्वागत पाहून हे शिष्टमंडळही अवाक् झालं.

13 मार्च रोजी शिष्टमंडळ भारतात

13 मार्च रोजी हे ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळ भारतात आलं आहे. त्याआधी या शिष्टमंडळाने आग्र्याचा दौरा केला. 17 मार्च रोजी हे शिष्टमंडळ हैदराबादलाही गेलं होतं. आज या शिष्टमंडळाने लोकसभेचं कामकाज पाहिलं.

संबंधित बातम्या:

CWC Meeting : काँग्रेसच्या सातत्याने होणाऱ्या पराभवाचं नेमकं कारण राहुल गांधींना सापडलं?; 52 नेत्यांसमोर म्हणाले…

गोवा भाजपमध्ये सुंदोपसुंदी; मुख्यमंत्री सावंतांविरोधात आमदार राणेंनी थोपटले दंड, प्रकरण काय?

CWC Meeting : काँग्रेसची सगळी सूत्र सोनियांकडेच! काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत राजीनाम्याबाबत चर्चा नाहीच

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.