CWC Meeting : काँग्रेसच्या सातत्याने होणाऱ्या पराभवाचं नेमकं कारण राहुल गांधींना सापडलं?; 52 नेत्यांसमोर म्हणाले…

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या पाचही राज्यात काँग्रेसला प्रचंड पराभव पत्करावा लागला आहे. पंजाबमध्ये तर असलेली सत्ताही काँग्रेसला गमवावी लागली आहे. गोव्यात मागच्यावेळी काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती.

CWC Meeting : काँग्रेसच्या सातत्याने होणाऱ्या पराभवाचं नेमकं कारण राहुल गांधींना सापडलं?; 52 नेत्यांसमोर म्हणाले...
काँग्रेसच्या सातत्याने होणाऱ्या पराभवाचं नेमकं कारण राहुल गांधींना सापडलं?; 52 नेत्यांसमोर म्हणाले...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 12:45 PM

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या पाचही राज्यात काँग्रेसला प्रचंड पराभव पत्करावा लागला आहे. पंजाबमध्ये तर असलेली सत्ताही काँग्रेसला (congress) गमवावी लागली आहे. गोव्यात मागच्यावेळी काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती. मात्र, यावेळी काँग्रेसला गोव्यातही फारसा करिश्मा दाखवता आलेला नाहीये. त्यामुळे काँग्रेस खडबडून जागी झाली आहे. काल रविवारी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे एकूण 52 नेते उपस्थित होते. तब्बल पाच तास ही बैठक चालली. यावेळी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वातच पक्ष पुढे नेण्याचं ठरलं. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या पराभवाच्या नेमक्या कारणावर बोट ठेवलं. आपण अजूनही जुन्याच पद्धतीने निवडणूक लढवत आहोत. त्यामुळेच सातत्याने आपल्याला पराभव पत्करावा लागत आहे, असं राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.

राहुल गांधी यांनी या बैठकीत थेट पक्षाच्या पराभवाची कारण मिमांसा केली. आपलं उद्देश काय आहे आणि आपल्याला लोकांपर्यंत काय न्यायचं आहे हे स्पष्ट पाहिजे. आपल्याला वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळी रणनीती बनवली पाहिजे. भाजप स्वार्थासाठी निवडणूक लढत आहे. आपण पारंपारिक पद्धतीने निवडणूक लढवत आहोत. व्यक्ती आणि उमेदवार म्हणून निवडणूक लढवता कामा नये तर एक पक्ष म्हणून आपल्याला लढलं पाहिजे. आपण महात्मा गांधी, नेहरू आणि पटेलांच्या सिद्धांतांचे पालन करतो. आपण संपूर्ण देशासाठी लढतो. तर काही पक्ष केवळ विशिष्ट उद्देशासाठी लढत आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

आघाडीच्या राजकारणावर भर

काँग्रेसने आता यापुढे आघाडीचं राजकारण केलं पाहिजे. आपले सहकारी मित्र पक्ष कोण असतील हे शोधलं पाहिजे आणि आघाडीबाबतची रणनीती तयार केली पाहिजे, असं माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं. तर पक्षाने समान विचारधारा असणाऱ्या पक्षांना शोधलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक यांनी सांगितलं.

ईव्हीएमबाबत गांभीर्याने विचार

या बैठकीत ईव्हीएमबाबतही चर्चा केली. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या बैठकीत ईव्हीएमचा मुद्दा उचलला. ईव्हीएमच्या मुद्दयावर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. ईव्हीएम संबंधित मुद्दे निकाली काढण्यासाठी पुढील धोरण काय असेल यावर विचार केला पाहिजे, असं बघेल यांनी सांगितलं. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संघटना मजबूत करण्यात येणार आहे. संघटनेत सुधारणा करण्याचे तात्काळ निर्देश देण्यात आले आहे. येत्या काळात ही सुधारणा दिसून येईल, असं काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं.

प्लस मायनसवर चर्चा

2022 आणि 2023मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील आव्हाने दूर करण्यासाठी तयारी करण्यात येणार असल्याचं काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत ठरलं. यावेळी पक्षाच्या मायनस आणि प्लसवरही चर्चा झाली. याबाबतचा एक अहवाल सादर करण्यात आला. भविष्यात काय काय सुधारणा करण्याची गरज आहे, त्यावरही या बैठकीत चर्चा झाली.

संबंधित बातम्या:

VIDEO | तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट, शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते निशाण्यावर; राऊतांच्या दाव्याने खळबळ

उत्तरात काय असेल हे उत्तर आल्यावरच कळेल, दिलीप वळसे-पाटलांचं सूचक विधान

CWC Meeting : काँग्रेसची सगळी सूत्र सोनियांकडेच! काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत राजीनाम्याबाबत चर्चा नाहीच

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.