CWC Meeting : काँग्रेसची सगळी सूत्र सोनियांकडेच! काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत राजीनाम्याबाबत चर्चा नाहीच

आज काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ आणि महत्वाचे नेते उपस्थित होते. जवळपास चार तास चालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अखेर सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसची सगळी सूत्र ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं!

CWC Meeting : काँग्रेसची सगळी सूत्र सोनियांकडेच! काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत राजीनाम्याबाबत चर्चा नाहीच
काँग्रेसचं नेतृत्व सोनिया गांधींकडेच राहणार, कार्यकारिणी बैठकीत निर्यणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 11:28 PM

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसला मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपला रोखणं काँग्रेसला शक्य झालं नाहीच. सोबतच पंजाबमधील सत्ताही काँग्रेसला गमवावी लागली. आम आदमी पक्षासमोर (Aam Admi Party) काँग्रेस भूईसपाट झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ आणि महत्वाचे नेते उपस्थित होते. जवळपास चार तास चालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अखेर सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसची सगळी सूत्र ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं!, तशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसल्यानंतर काँग्रेस नेतृत्वात मोठे बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीही सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात पार पडली. या बैठकीत पाच राज्यातील पराभवाच्या कारणांवर सविस्तर चर्चा झाली. महत्वाची बाब म्हणजे या बैठकीत काँग्रेसचं नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय झाला. तसंच येत्या काळात काँग्रेस देशपातळीवर चिंतन शिबिर घेणार असल्याचंही कळतंय. इतकंच नाही तर राहुल गांधी यांनी आता सक्रिय व्हावे असा सूरही या बैठकीत उमटल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

आझाद, माकन, शर्मा एक पाऊल मागे!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आजच्या कार्यकारिणी बैठकीत सोनिया गांधी यांनी आपल्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, सोनिया यांचा राजीनामा सर्वांनी फेटाळून लावला. सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यावर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अजय माकन आणि आनंद शर्मा यांनी एक पाऊल मागे घेत, आमचा सल्ला हा पक्षाच्या भल्यासाठी आहे. आम्हाला विरोधक किंवा शत्रू समजलं जाऊ नये, असं म्हटलं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी काँग्रेस कार्यकारिणीने सर्वानुमते सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदी राहावं असा निर्णय घेतला. काँग्रेस पक्ष लवकरत चिंतन शिबरांचं आयोजन करेल, अशी माहितीही त्यांनी दिलीय.

राहुल गांधी, प्रियंका गांधींचं मत काय?

काँग्रेस पक्षाला राज्यनिहाय रणनिती आखावी लागेली. कुठे एकट्याने तर कुठे स्थानिक पक्षांसोबत आघाडी करावी लागेल, असं मत राहुल गांधी यांनी या बैठकीत व्यक्त केलं. तर प्रियंका गांधी म्हणाल्या की, निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने असणार नाही हे माहिती होतं. पण मेहनत केली आणि लढाई लढलो.

इतर बातम्या :

Video : उमा भारतींची दारूबंदी मोहीम चिघळली, दारूच्या दुकानात घुसून दगडफेक, बाटल्या फोडल्या

CWC Meeting : ‘देशाला मिळालेलं स्वातंत्र्य जनतेला सोबत घेऊन वाचवू’, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, कोणत्या मुद्द्यांवर खल?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.