Maharashtra Board 12th Result 2024 Declared : बारावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी, सर्वात कमी मुंबई विभागाचा निकाल
MSBSHSE Maharashtra Board Class 12th (HSC) Result 2024 LIVE : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेण्यात आल्या. आज या परीक्षेच्या निकाल जाहीर झालाय. विशेष म्हणजे यंदाही टक्केवारीमध्ये विद्यार्थ्यांनी चांगलाच धमाका नक्कीच केलाय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाबद्दलचे मोठे अपडेट काल शेअर करण्यात आले. आज म्हणजेच 21 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय. यंदाच्या विद्यार्थ्यांनी टक्केवारीमध्ये धमाका केलाय. विज्ञान, कला आणि वाणिज्य तिन्ही शाखेंचा निकाल जबरदस्त लागलाय. कोकण विभाग अव्वल ठरलाय. राज्यात बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे मुलींनी या निकालात बाजी मारली आहे. यंदा सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी टक्केवारीबद्दलची सविस्तर माहिती दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. पुणे 94.44 टक्के, नागपूर 92.12 टक्के, संभाजी नगर 94.08 टक्के, मुंबई 91.95 (सर्वात कमी), कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36, कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)
Maharashtra HSC RESULT
154 विषयासाठी परीक्षा घेण्यात आली. एकूण परीक्षार्थी 14 लाख 23 हजार 970 उत्तीर्ण परीक्षार्थी 13 लाख 29 हजार 684. 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल शंभर टक्के आहे. विज्ञान विभाग निकाल 97.82 कला शाखा निकाल 85.88, वाणिज्य विभाग निकाल 92.18, व्यवसाय अभ्यासक्रम 87.25 गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल 2.12 ने जास्त लागला आहे.
राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या. विशेष म्हणजे दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात कॉपीमुक्त परीक्षा या पार पडल्या. परीक्षेची तयारी बोर्डाकडून कित्येक तरी दिवसांपासून केली जात होती. यंदा परीक्षा केंद्रांवर देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. हेच नाही तर भरारी पथकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ करण्यात आली.
बारावीची परीक्षा नऊ विभागांमध्ये पार पडलीये. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण याप्रमाणे. यंदा बारावीची परीक्षा तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी दिली. आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे दहावीच्या निकालाची. चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याचे बोर्डाकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय.
आता बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालाची प्रतिक्षा आहे. बोर्डाकडून काही दिवसांपूर्वीच हे स्पष्ट करण्यात आले की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हे मेच्या चाैथ्या आठवड्यात. दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मात्र, अध्याप दहावीच्या निकालाची तारीख ही जाहीर करण्यात नाही आली.