Maha CET : एमबीए आणि एमसीए सीईटीसाठी नोंदणी सुरु, 7 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची संधी

Maha CET :  एमबीए आणि एमसीए सीईटीसाठी नोंदणी सुरु, 7 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची संधी
MH CET Cell
Image Credit source: MH CET Cell Website

महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (Cet Cell) कक्षाकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 18, 2022 | 9:48 PM

मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (Cet Cell) कक्षाकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. राज्यात विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची प्रक्रिया सुरु आहे. सीईटी सेलकडून मास्टर ऑफ बिझनेस अ‌ॅडमिनिस्ट्रेशन (MBA) आणि मास्टर इन कॉम्प्युटर अ‌ॅप्लिकेशन या दोन्ही अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तर, राज्य सीईटी सेलकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार विद्यार्थी 7 एप्रिल पर्यंत नोंदणी करु शकतात, त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

एमबीए सीईटीसाठीची शैक्षणिक पात्रता

एमबीए सीईटी परीक्षा 2022 साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून कमीतकमी 50 टक्के गुणांसह पदवी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, राखीव प्रव्रगातील विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के गुणांची मर्यादा निश्चित करण्यात आलीय. कोणत्याही शाखेत मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर झालेल्या पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षेला बसणारे सर्व उमेदवार पात्र असतील.

एमसीए सीईटी परीक्षेसाठी आवश्यक पात्रता

संगणक विज्ञान अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी किंवा बीसीए पदवी उत्तीर्ण आणि कमीतकमी 50% गुण मिळवलेले असणं आवश्यक आहे. तर, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार, कमीतकमी 45% टक्के गुण मिळवेले असणं आवश्यक आहे. पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षासाठी आलेले उमेदवारही सीईटीसाठी पात्र ठरतील.

सीईटी परीक्षा कशी होणार?

महाराष्ट्र राज्य सीईटी सेलकडून एमबीए आणि एमसीए सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार नाही.परीक्षेसंदर्भातील आगामी माहिती येत्या काळात जाहीर केली जाणार आहे.

इतर बातम्या:

MH CET Law 2022: महाराष्ट्र एलएलबी प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर, 19 मार्चपासून नोंदणी

GATE 2022 Answer Key Declared : गेट परीक्षेची उत्तर तालिका जाहीर, स्कोअरकार्ड 21 मार्चला मिळणार


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें