SSC website crash : दहावीच्या निकालाच्या गोंधळाच्या चौकशीचा राज्य सरकारचा मोठा निर्णय, समिती स्थापन, कारवाई होणार का?

दहावीच्या निकालात उद्भवलेल्या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. संकेतस्थळ डाऊन झालं या प्रकरणी चौकशी करण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थापण करण्यात आली आहे.

SSC website crash : दहावीच्या निकालाच्या गोंधळाच्या चौकशीचा राज्य सरकारचा मोठा निर्णय, समिती स्थापन, कारवाई होणार का?
दहावीच्या निकालाच्या वेबसाईट डाऊन

पुणे: दहावीच्या निकालात उद्भवलेल्या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. संकेतस्थळ डाऊन झालं या प्रकरणी चौकशी करण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थापण करण्यात आली आहे. पाच सदस्यीय समिती संकेतस्थळाची जबाबदारी कोणाची आहे ? हे निश्चित करेल, त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं काढले आहेत. विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्या आहे हे माहीत असताना तांत्रिक नियोजन केलं होतं का ? असा, सवाल राज्य सरकारने बोर्डाला विचारला आहे.

15 दिवसात अहवाल देण्याचे आदेश

दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना 1 वाजता उपलब्ध होणार होता.नेमकं निकाल जाहीर झाल्यानंतर सहा तासांहून अधिक वेळ संकेतस्थळ क्रॅश झालं होतं. राज्य सरकारने अहवाल सादर करण्याचे माध्यमिक बोर्डाला आदेश आहेत. गोंधळाची चौकशी होऊन कारवाई कोणावर केली जाणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

वेबसाईट डाऊन का झाल्या?

एक वाजता निकाल पाहण्यासाठी खुला केल्यावर सर्व्हरवर लोड आला. फायर वॉलवर गर्दी झाली. त्यामुळं वेबसाईट हँग झाली. 60 हजार निकाल डाऊनलोड झाले. दीड लाख लोक आता वेबसाईटवर आहेत. दोन नव्या लिंक तयार केल्या आहेत. वेबसाईट सुस्थितीत यायला थोडा वेळ लागणार आहे, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

वेबसाईट डाऊनला जबाबदार कोण?

सर्व्हरवर लोड आला असं बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं. पण तांत्रिकदृष्ट्या लोड येणार हे साहजिक होतं. दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 16 लाखांपेक्षा जास्त होती. त्यामुळे वेबसाईटवर निकाल लागण्यास सुरु झाल्यानंतर 16 लाख लोक एकत्र वेबसाईटवर येणे स्वाभाविक आहे. त्यासाठी बोर्डाने सर्व्हरची क्षमता वाढवून ठेवणे आवश्यक होतं. मात्र त्याची तयारी बोर्डाने केलीच नाही हे यावरुन स्पष्ट होतंय. राज्यातील दहावीचे 16 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक दुपारी 1 वाजल्यापासून ताटकळत आहेत. या सर्व गैरप्रकाराला कोण जबाबदार? त्यांच्यावर काय कारवाई होणार?

शालेय शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे निर्देश

दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

इतर बातम्या

Maharashtra SSC Result 2021: दहावी निकालाच्या वेबसाईट रात्री उशिरा पूर्ववत, बोर्डाच्या प्रयत्नांना यश, विद्यार्थी आनंदित

SSC website crash : 16 लाख विद्यार्थी 6 तासांपासून ताटकळत, बोर्ड म्हणतं अजून थोडी वाट पाहा!

Maharashtra Government form committee for enquiry of website down of Maharashtra Board SSC Result 2021

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI