दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचं सावट? पालकांना मुलांच्या आरोग्याची काळजी

बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल आणि दहावीच्या परीक्षा 29 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. Maharashtra Parents hsc ssc exam

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना विषाणून संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल आणि दहावीच्या परीक्षा 29 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. मात्र, वाढत्या कोरोनामुळे पालकांना भीती वाटतं आहे. पालकांनी कोरोन रुग्ण वाढत असल्यानं परीक्षा केंद्रावर जाणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. (Maharashtra Parents fill risky about their pupil to appear hsc ssc exam during corona outbreak)

परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांना लस द्या

महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा 23 एप्रिला आणि दहावीच्या परीक्षा 29 एप्रिलपासून सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे कर्मचारी परीक्षा पार पाडणार आहेत त्यांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहेय. येत्या आठवडाभरात परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

पालकांमध्ये नाराजी

महाराष्ट्रात दररोज 40 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना मुलांना परीक्षा देण्यास पाठवण्यावरुन पालकांमध्ये नाराजी आहे. माजी शिक्षण संचालक जे एम अभ्यकंर यांनी याविषयी बोलताना परीक्षा जून महिन्यात घेणं शक्य असल्याचं म्हटलं. जून महिन्यात परिस्थिती सामान्य असल्यास एका दिवशी दोन पेपर घेता येतील, असंही ते म्हणाले.

दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार

नव्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

पहिली ते आठवी सरसकट पास

च्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

कोव्हिडची परिस्थित लक्षात घेता महाराष्ट्रातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास केले जाणार आहे. तर नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल

संबंधित बातम्या:

Maharashtra ssc hsc Exam : पहिली ते आठवी सरसकट पास, नववी ते बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय?

SSC HSC Exams : राज्यात कडक निर्बंध, परीक्षा कशा घ्यायच्या, शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

(Maharashtra Parents fill risky about their pupil to appear hsc ssc exam during corona outbreak)