शाळा सुरु करा, राज्यातील बहुतांश पालकांचं मत, शालेय शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण सुरु

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यासदंर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्या शासन निर्णयानुसार कोरोनामुक्त गावात 15 जुलैपासून शाळा सुरु करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाईन सर्वेक्षण सुरु केलं आहे.

शाळा सुरु करा, राज्यातील बहुतांश पालकांचं मत, शालेय शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण सुरु
शाळा

पुणे : महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यासदंर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्या शासन निर्णयानुसार कोरोनामुक्त गावात 15 जुलैपासून शाळा सुरु करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाईन सर्वेक्षण सुरु केलं आहे. हे सर्वेक्षण 12 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. त्या सर्वेक्षणात बहुतांश पालकांचा कल हा 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याकडं असल्याचं समोर आलं आहे. (Maharashtra rural area parents gave response to start school class of 8 to 12th in corona free area )

84 टक्के पालक म्हणतात शाळा सुरु करा

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण सुरु केलं आहे. या सर्वेक्षणात आतापर्यंत सव्वा दोन लाख पालकांनी मते नोंदविली असून त्यातील जवळपास 84 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शवली आहे. हे सर्वेक्षण येत्या 12 जुलैपर्यत सुरू राहणार

शाळा सुरु करण्यासंदर्भात वारंवार विचारणा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इ.8 वी ते 12 वी चे वर्ग दि.15 जुलै 2021 पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यासंदर्भात पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत.

सर्वेक्षणात मत कुठं नोंदवायचं?

सर्व पालक, शिक्षक शाळा सुरु करण्यासंदर्भात त्यांचा अभिप्राय नोंदवण्यासाठी http://www.maa.ac.in/survey या वेबसाईटवर भेट देऊ शकतात. 12 जुलै 2021 रोजी रात्री 11.55 पर्यंत सुरु राहील. ग्रामीण भागातील पालकांनी यामध्ये त्यांचा अभिप्राय नोंदवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

नियमांचं पालन करणं आवश्यक

कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे या नियमांचं पालन करण्यात यावं, असं शासनानं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.

मार्गदर्शक सूचना

संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.

1) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे;

शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.

Thermometer, जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची – स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी. वापरण्यात येणारे thermometer हे calibrated contactless infrared digital thermometer असावे.

• एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.

. क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.

2) शिक्षकांची कोविड-१९ बाबतची चाचणी:

संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड- १९ साठीची RTPCR / RAPID ANTIGEN चाचणी करावी.

3) बैठक व्यवस्था :

• वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी.

वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी, कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

भारतात केवळ 22 टक्के शाळांकडेच इंटरनेट सुविधा, शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतूनच उघड

(Maharashtra rural area parents gave response to start school class of 8 to 12th in corona free area )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI