MHT CET Result Date 2024 : एमएचटी सीईटीचा निकाल कधी? मोठी अपडेट काय?; जाणून घ्या एका क्लिकवर

MHT CET परीक्षा 2024 च्या निकालाची वाट विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून सतत वाट पाहताना दिसत आहेत. दोन टप्प्यात ही परीक्षा झालीये. लवकरच या परीक्षेचा निकाल लागणार असल्याचे देखील सांगितले जातंय. विद्यार्थ्यांचे या परीक्षेच्या प्रत्येक अपडेटकडे लक्ष आहे.

MHT CET Result Date 2024 : एमएचटी सीईटीचा निकाल कधी? मोठी अपडेट काय?; जाणून घ्या एका क्लिकवर
MHT CET Result 2024
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 12:37 PM

महाराष्ट्र कॉमन इ एंट्रन्स टेस्ट 2024 परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून वाट पाहताना दिसत आहेत. ही परीक्षा पीसीएम, पीसीबी गटासाठी घेण्यात आलीये. आता या परीक्षेच्या निकालाबद्दलचे अत्यंत मोठे अपडेट येताना दिसत आहे. 19 जून 2024 पर्यंत या परीक्षेचा निकाल कधीही लागू शकतो. 12 जूनला निकाल लागणार असल्याची देखील जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. राज्यात ही परीक्षा 22 एप्रिल ते 17 मे यादरम्यान घेण्यात आली. विद्यार्थी हे परीक्षेच्या निकालाच्या प्रतिक्षेत दिसत आहेत. अशीही एक चर्चा आहे की, पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्येही या परीक्षेचा निकाल लागू शकतो.

अजूनही या परीक्षेच्या निकालाची तारीख तशी जाहीर करण्यात नाही आलीये. परीक्षा सेलकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले की, 12 जून 2024 नंतर कधीही या परीक्षेचा निकाल लागू शकतो. या परीक्षेचा निकाल आपल्याला MAHACET च्या cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बघता येईल.

MHT CET परीक्षा 2024 ही 22 एप्रिल ते 17 मे मध्ये पार पडली. यामध्ये 2 मे ते 17 मे यादरम्यान पीसीएम गटाची परीक्षा घेण्यात आली. पीसीबी गट परीक्षा 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान घेण्यात आली. दोन टप्प्यात ही परीक्षा पार पडली. विशेष म्हणजे दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा झाली. सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 याप्रमाणे.

MHT CET निकाल कुठे आणि कसा तपासायचा, पाहा अगदी सोपी पद्धत-

MHT CET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वात अगोदर अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जावे लागेल. एमएचटी सीईटी निकालाशी संबंधित लिंक होम पेजवर फ्लॅश होईल, त्यावर तुम्हाला सर्वात अगोदर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पुढे तिथे विचारण्यात आलेली सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल.

आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का?, हे विद्यार्थ्याने सर्वात अगोदर पाहावे आणि मग सबमिटचे बटन दाबा. यानंतर MHT CET निकाल 2024 तुमच्या स्क्रीनवर दिसेल. निकाल डाउनलोड करा. अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही निकाल पाहू शकता. नीटचा निकाल जाहीर करण्यात आलाय. मात्र, त्यामध्ये मोठा गोंधळ असल्याचे बघायला मिळतंय. परीक्षा परत घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जातंय.

Non Stop LIVE Update
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको.
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी.
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?.
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ.
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.