AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC 10th Result 2023 : मुंबई, पुणे, कोकण कुठल्या विभागाचा किती टक्के निकाल जाणून घ्या

Maharashtra Board SSC 10th Result : यंदा 10 वीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 29 हजार 96 इतके विद्यार्थी बसले होते. त्यातून किती मुलं पास झाली जाणून घ्या सर्वकाही.

SSC 10th Result 2023 : मुंबई, पुणे, कोकण कुठल्या विभागाचा किती टक्के निकाल जाणून घ्या
SSC 10 th ResultImage Credit source: PTI
| Edited By: | Updated on: Jun 02, 2023 | 12:41 PM
Share

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या 10 वी च्या शालान्त परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. विद्यार्थी, पालक, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्वांच दहावीच्या निकालाकडे लक्ष असतं. कारण दहावीच्या निकालावर पुढील महाविद्यालयीन प्रवास कसा होणार? कुठच्या दिशेने जाणार? ते ठरतं. आज दुपारी 1 वाजता दहावी शालान्त परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद झाली.

2 मार्च ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली. विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी दिवस-रात्र मेहनत करतात. मनासारख्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा हा त्यामागे उद्देश असतो.

किती विद्यार्थी दहावीला बसले? किती पास झाले?

यंदा महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी चा निकाल 93.83 % लागला. यंदाही निकालाक मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाल 95.87 टक्के आणि मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला. 15 लाख 29 हजार 96 इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 14 लाख 34 हजार 898 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती.

कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के, कोण अव्वल, कोण तळाला जाणून घ्या.

– कोकण 98. 11%

– पुणे 95.64%

– मुंबई 93.66%

– औरंगाबाद 93.23% – नाशिक 92.22%

– कोल्हापूर 96.73%

– अमरावती 93.22%

– लातूर 92.66%

– नागपूर 92.05%

नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल 92.49%, तर   कोकण विभाग ठरला अव्वल 98.11%

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.