Nanded Vidyapeeth: नांदेड विद्यापीठाच्या परीक्षांवर पावसाची नजर! पाऊस काय पेपर होऊ देत नाही, तारखांमध्ये मोठे बदल

Nanded Vidyapeeth: खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुणे मुंबईसह आता ह्या जिल्ह्यांमध्ये नांदेडचा (Nanded City) सुद्धा समावेश झालाय. अतिवृष्टीमुळे नांदेड विद्यापीठाच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आलेले आहेत.

Nanded Vidyapeeth: नांदेड विद्यापीठाच्या परीक्षांवर पावसाची नजर! पाऊस काय पेपर होऊ देत नाही, तारखांमध्ये मोठे बदल
Nanded VidyapeethImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 10:57 AM

नांदेड: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीचा तडाखा बऱ्याच भागांना बसलेला आहे. जून, जुलै महिने शिक्षण विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. परीक्षा, निकाल, महाविद्यालयीन प्रवेश या सगळ्या घडामोडींचा हा महिना. अतिवृष्टीमुळे आता शिक्षण विभागावर सुद्धा परिणाम होताना दिसून येतोय. राज्यात अनेक भागात अतिवृष्टीच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुणे मुंबईसह आता ह्या जिल्ह्यांमध्ये नांदेडचा (Nanded City) सुद्धा समावेश झालाय. अतिवृष्टीमुळे नांदेड विद्यापीठाच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आलेले आहेत. आजपासुन सुरू होणाऱ्या पीएचडीच्या (Nanded Vidyapeeth PhD Exam) परीक्षा आता 25 जुलै पासून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर पदव्युत्तर परीक्षा 13 ऐवजी 18 जुलै पासून होणार असल्याचीही माहिती मिळतीये. नांदेडमध्ये आज सलग पाच दिवस पावसाची संततधार (Nanded Rain) सुरूच आहे. नागरिकांना सूर्यदर्शन सुद्धा लाभलेलं नाही. जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगफुटी सारखा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नांदेड शहरात सगळीकडे पाणी साचलेले आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 नदीकाठच्या असंख्य गावांचा संपर्क तुटला

अर्धापुर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेकडो हेक्टर जमिनीसह रस्ते पाण्याखाली गेलेत. विष्णुपुरी धरण (Vishnupuri Dam) जवळपास 80 टक्के भरलं आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी सह सर्वच उपनद्या दुथडी भरून वाहतायत. नांदेडमध्ये पैनगंगा, गोदावरी (Godavari river) आणि आसना ह्या तिन्ही नद्या तुडुंब भरल्यामुळे नदीकाठच्या असंख्य गावांचा संपर्क तुटलाय. सलग पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेय. हजारो हेक्टर जमिनी पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

नांदेडमध्ये गावोगावी लोकांचे हाल

पावसाची संततधार सुरूच असल्याने असंख्य रस्ते पाण्याखाली बुडाले आहेत. किनवट तालुक्यातील धामणदरी इथल्या ग्रामस्थांना तर मानवी साखळी बनवत घर गाठावं लागतंय. धामणदरी गावाला येजा करण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. कच्च्या रस्त्यातून प्रवास करावा लागतोय.बिलोली शहराला पाण्याच्या विळख्याने वेढलंय, बिलोली तालुक्यात रात्री सर्वदूर अतिवृष्टी झालीय. त्यामुळे बिलोली शहरासह तालुक्यात सर्वत्र पाणी साचलेलं दिसतंय. तर बिलोली मध्ये संततधार पावसाने घरं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.