New Education Policy: इंटिग्रेटेड बीएड प्रोग्राम 2022 पासून सुरु होणार, वाचा सविस्तर

चार वर्षाचा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम पुढील वर्षी म्हणजेच 2022 पासून सुरू होऊ शकतो.

New Education Policy: इंटिग्रेटेड बीएड प्रोग्राम 2022 पासून सुरु होणार, वाचा सविस्तर
प्रातिनिधीक फोटो

नवी दिल्ली : नवीन शिक्षण धोरणामुळे भारतातील शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल होणार आहेत. देशातील प्रत्येक भागात त्याची अंमलबजावणी करण्याचे काम केले जात आहे. त्यानुसार चार वर्षाचा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम पुढील वर्षी म्हणजेच 2022 पासून सुरू होऊ शकतो. नवीन शिक्षण धोरण राबविण्यासाठी स्थापन केलेल्या उच्च शिक्षण विभागाच्या स्थायी समितीमध्ये यावर चर्चा करण्यात येत आहे. (New Education Policy integrated bed programme may be implemented from 2022)

2030 नंतर चार वर्षांच्या एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण असलेल्या उमेदवारांना शिक्षकाची नोकरी मिळणार आहे. नवीन शिक्षण धोरणामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहेय. काही वर्षांपूर्वी बी.एड. अभ्यास्करम एक वर्षाचा होता त्यानंतर त्याचा कालावधी दोन वर्ष करण्यात आला.

सीबीसीएस पद्धतीनं अभ्यासक्रम

चार वर्षांच्या कालावधीच्या बीएड अभ्यासक्रमामध्ये चॉईस बेस क्रेडिट सिस्टममुळे अनेक विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. उदा. एखाद्या विद्यार्थ्याला बी.एससी ऑनर्ससह बी.एड. करु शकतो. पदवी दरम्यान ते बीएससी तसेच बी.एडचा अभ्यासक्रम शिकू शकतात. बीएससी ऑनर्स तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर, चौथ्या वर्षी, त्यांना बी.एडच्या उर्वरित विषयांचा अभ्यास करावा लागेल, ज्यामुळे या चार वर्षांच्या काळात इंटिग्रेटेड बी.एड. प्रोग्रामची पदवी प्राप्त होईल. या पदवीचे नाव इंटिग्रेटेड बीएससी-बीएड असेल. याशिवाय या कोर्सबरोबर इंटर्नशिपही करावी लागेल.

तीन वर्षानंतर पदवी मिळणार

एखाद्या विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम तीन वर्षानंतर सोडण्याची इच्छा असल्यास ते सोडू शकतात. त्यांना तीन वर्षानंतर पदवी मिळेल. तसेच या तीन वर्षांत एका विद्यार्थ्याला बी.एड. कोर्सशी संबंधित सर्व विषयांचे प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बँकेमध्ये क्रेडिट म्हणून दिले जातील. भविष्यात बी.एडचा अभ्यास करायचा असेल तर विद्यार्थी ते क्रेडिट वापरु शकतो.

नवीन शिक्षण धोरणांतर्गत राबविण्यात येणारा इंटिग्रेटेड बी.एड अभ्यास्करमाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यावरच या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतल्यास पुढील चार वर्षांमध्ये त्याच्याकडे शिक्षक बनण्यासाठीची .पात्रता असेल. इंटिग्रेटेड बीएड अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी देशातील 2700 महाविद्यालयांनीही अर्ज केले होता.

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांचे संकेत

अक्षयची ‘बेल बॉटम’ दहशतवादी घटनेवर आधारीत; वाचा चित्रपटाची कहाणी! 

(New Education Policy integrated bed programme may be implemented from 2022)