AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांचे संकेत

राज्य सरकार सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. (night curfew Maharashtra Vijay Wadettiwar)

मोठी बातमी ! राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांचे संकेत
संचारबंदी
| Updated on: Feb 20, 2021 | 1:50 PM
Share

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांचे नियमांकडील दुर्लक्ष या गोष्टीं लक्षात घेता राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. संध्याकाळी 6 ते सकाळचे 9 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे. (night curfew could be implemented in Maharashtra said Vijay Wadettiwar)

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला थोपवण्याठी राज्य सरकार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करत असले तरी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

नाईट कर्फ्यूविषयी बोलताना “मास्क लावणं, गर्दी टाळणं या गोष्टी नागरिकांनी पाळाव्यात. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचं सुरु केलं आहे. साधारणत: संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकारचा विचार सुरु आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

राज्यभर नाईट कर्फ्यू लागू होणार का?

नाईट कर्फ्यूचे संकेत दिल्यानंतर राज्यात एकाच वेळी कर्फ्यू लागू केला जाणार का?, असा प्रश्न नागिरकांना पडत आहे. याविषयी बोलताना राज्यभर कर्फ्यू लागू करण्यापेक्षा त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधीचे अधीकार दिले आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या. कोरोनाचा प्रसार, होणारी गर्दी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नाईट कर्फ्यू संदर्भात तेथील जिल्हाधिकारी निर्णय घेतील. तसे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र कितीही सांगितलं तरी लोक विनामास्कचे फिरत आहेत. कुठलीही काळजी लोक घेत नाही. त्यामुळे आता काही कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, मास्क लावणं, गर्दी टाळणं, हे नियम नागरिकांनी पाळावेत. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचं सुरु केलं आहे. साधारणत: संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरु आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते,” असे विजय वेडेट्टीवार म्हणाले.

इतर बातम्या  :

मुंबईत हॉटेल, पब, रेस्टॉरंट, मंगलकार्यालयांना नोटीसा; महापालिका कामाला लागली

(night curfew could be implemented in Maharashtra said Vijay Wadettiwar)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.