NTSE Exam: नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली, अंतिम उत्तर तालिका जाहीर

नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएसई) च्या दुसर्‍या टप्प्यात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) स्टेज 2 मधील परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. NTSE Exam Final Answer Key

NTSE Exam: नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली, अंतिम उत्तर तालिका जाहीर
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 10:50 PM

नवी दिल्ली: नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएसई) च्या दुसर्‍या टप्प्यात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) स्टेज 2 मधील परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. एनटीएसईनं उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेची ओएमआर उत्तरपत्रिकेची प्रत जाहीर केली आहे. उमेदवारांनी निकालासाठी वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (NTSE Exam Final Answer Key Released by National Council for Education Research and training result declare on 10 July)

नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँण्ड ट्रेनिंग (एनसीईआरटी) ने अधिकृत वेबसाईट ncert.nic.in वर एनटीएसई स्टेज २ मधील मेंटल अ‍ॅबिलिटी टेस्ट (MAT) आणि स्कॉल्टिक एबिलिटी टेस्ट (SAT)च्या उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत.

10 जुलैला निकाल जाहीर

एनसीईआरटीतर्फे स्टेज 2 परीक्षा 14 फेब्रुवारी 2021 रोजी परीक्षा घेतली होती. यानंतर परिषदेने 19 मे 2021 रोजी नोटीस या संदर्भातील नोटीस जाहीर केलं होतं. त्यानुसार फेज 2 च्या अंतिम उत्तरतालिका आणि विद्यार्थ्यांच्या ओएमआर 15 जून 2021 पासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध केल्या आहेत. एनटीएई फेज 2 चा निकाल 10 जुलै 2021 रोजी जाहीर केला जाईल.

उत्तर तालिका कशी डाऊनलोड करायची?

एनटीएसई स्टेज 2 मानसिक क्षमता चाचणी अंतिम उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी उमेदवार एनसीईआरटी वेबसाइट ncert.nic.in वर भेट देऊ शकतात. त्यानंतर होमपेजवरील मानसिक क्षमता चाचणी आणि स्कोलास्टिक अ‌ॅबिलीटी टेस्ट लिंकवर क्लिक करा. यानंतर अंतिम उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल. उमेदवार ही पीडीएफ फाईल प्रिंट करू शकतात आणि त्याची सॉफ्ट कॉपीही जतन करुन ठेऊ शकतात.

नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा काय?

नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा ही भारतीय विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी योजना आहे. गेल्या शालेय शैक्षणिक वर्षातील परीक्षेत 60 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी या परीक्षेत सहभाग घेऊ शकतात. ही परीक्षा दोन टप्प्यात आयोजित केली जाती. पहिला टप्पा राज्यस्तरावर होतो. जे एनटीएसई संबंधित परीक्षा नियामक मंडळ किंवा विविध राज्यात राज्य मंडळाद्वारे आयोजित केली जाते. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दुसर्‍या टप्प्यात स्टेज 2 परीक्षेस बसतात. दुसरा टप्पा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आयोजित करतो. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. दहावीत शिकणारे विद्यार्थी राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षेस बसतात. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याला दरवर्षी 12 हजार शिष्यवृत्ती दिली जाते.

संबंधित बातम्या:

SSC Result: दहावीच्या निकालसंदर्भात मोठी बातमी, विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण मिळण्याचा मार्ग मोकळा

कोरोना काळात महाविद्यालयीन फी कमी करा, 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसह युक्रांदची मागणी

NTSE Exam Final Answer Key Released by National Council for Education Research and training result declare on 10 July

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.