Pariksha Pe Charcha 2021: नरेंद्र मोदींची परीक्षा पे चर्चा कुठे पाहणार?, वाचा सविस्तर

Pariksha Pe Charcha 2021: नरेंद्र मोदींची परीक्षा पे चर्चा कुठे पाहणार?, वाचा सविस्तर
नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा

Pariksha Pe Charcha 2021कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे चौथे पर्व ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.

Yuvraj Jadhav

|

Apr 07, 2021 | 11:49 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा परीक्षा पे चर्चा 2021 (Pariksha Pe Charcha 2021) हा कार्यक्रम आज सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. परीक्षा पे चर्चा कार्यकमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असे एकूण 14 लाख व्यक्ती या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फोटो शेअर करत परीक्षा तणावमुक्त करुया, असं म्हटलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे चौथे पर्व ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.परीक्षा पे चर्चा कार्यक्रम प्रसारभारतीच्या 32 वाहिन्यांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रक्षेपित होणार आहे. (Pariksha Pe Charcha 2021 by Narendra Modi interaction with students know where and how to watch programme)

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं प्रक्षेपण कुठं पाहता येणार?

परीक्षा पे चर्चा कार्यक्रम स्वयंप्रभा, दुरदर्शनसह प्रसारभारतीच्या 32 वाहिन्यांवर प्रसारित होईल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय शिक्षणमंत्रालयाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन परीक्षा पे चर्चा प्रसारित होईल. पीआयबी आणि नरेंद्र मोदी यांच्या सांयकाळी 7 वाजता युट्युब, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कार्यक्रमाचं प्रसारण केले जाईल.

नरेंद्र मोदींना प्रश्न कोण विचारणार?

परीक्षा पे चर्चा 2021 स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी, शिक्षक आणि पालक पंतप्रधान नरेंदर् मोदींना प्रश्न विचारु शकणार आहेत. विजेत्यांना नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी असलेले स्मृतीचिन्ह 1500 विद्यार्थी, 250 पालक आणि 250 शिक्षक यांना देण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदी यांचं ट्विट

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं पहिल्या ऑनलाईन पर्वातील चर्चेसाठी उत्सुक असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या विषयांवर चर्चा होईल. यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी निश्चित काहीतरी असेल, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोदींनी त्यासोबत एक फोटो देखील शेअर केला आहे.

परीक्षा पे चर्चामध्ये प्रथमच पालकांना संधी

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात. यंदा विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी 2.62 लाखांहून अधिक शिक्षकांनी, 10.39 लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील नोंदणी केली आहे.

संबंधित बातम्या:

Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दिली माहिती

Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार, पालक पहिल्यांदाच सहभागी होणार

(Pariksha Pe Charcha 2021 by Narendra Modi interaction with students know where and how to watch programme)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें