Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार, पालक पहिल्यांदाच सहभागी होणार

Pariksha Pe Charcha 2021: नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 14 लाख विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी होणार आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:34 AM, 7 Apr 2021
Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार, पालक पहिल्यांदाच सहभागी होणार
परीक्षा पे चर्चा 2021

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा परीक्षा पे चर्चा 2021 (Pariksha Pe Charcha 2021) हा कार्यक्रम आज सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. परीक्षा पे चर्चा कार्यकमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असे एकूण 14 लाख जण या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली होती. पंतप्रधान मोदी यांनी एक फोटो शेअर करत परीक्षा तणावमुक्त करुया, असं म्हटलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे चौथे पर्व ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. (Pariksha Pe Charcha 2021 by Narendra Modi tweet and said excited for first ever virtual PPC2021 edition)

नरेंद्र मोदी यांचं ट्विट

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं पहिल्या ऑनलाईन पर्वातील चर्चेसाठी उत्सुक असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या विषयांवर चर्चा होईल. यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी निश्चित काहीतरी असेल, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोदींनी त्यासोबत एक फोटो देखील शेअर केला आहे.

रमेश पोखरियाल काय म्हणाले?

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असे एकूण 14 लाख जण सहभागी होत आहेत. परीक्षा पे चर्चा कार्यक्रम चौथ्यांदा होणार आहे. तर, परीक्षा पे चर्चा लेखन स्पर्धेत 81 देशांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.

परीक्षा पे चर्चामध्ये कोण सहभागी होतं?

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 9 वी ते 12 मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. कोरोना संसर्गामुळे यंदाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. 16 फेब्रुवारी 2018 ला परीक्षा पे चर्चामधील पहिला कार्यक्रम पार पडला होता. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं.

परीक्षा पे चर्चामध्ये प्रथमच पालकांना संधी

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात. यंदा विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी 2.62 लाखांहून अधिक शिक्षकांनी, 10.39 लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील नोंदणी केली आहे. innovateindia.mygov.in या वेबसाईटवर नोंदणी करण्याची अंतिम तारीख 14 मार्च होती.

संबंधित बातम्या

Pariksha Pe Charcha 2021: नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 14 लाख जणांची नोंदणी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दिली माहिती

(Pariksha Pe Charcha 2021 by Narendra Modi tweet and said excited for first ever virtual PPC2021 edition)