Pariksha Pe Charcha 2021: नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 14 लाख जणांची नोंदणी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

Pariksha Pe Charcha 2021: नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 14 लाख विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिली.

Pariksha Pe Charcha 2021: नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी  14 लाख जणांची नोंदणी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती
रमेश पोखरियाल निशंक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा परीक्षा पे चर्चा 2021 (Pariksha Pe Charcha 2021) हा कार्यक्रम बुधवारी 7 एप्रिलला होणार आहे. परीक्षा पे चर्चा कार्यकमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असे एकूण 14 लाख जण या  ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होतील. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी  एक व्हिडीओ शेअर करत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची माहिती दिली होती. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत 7 एप्रिलला सांयकाळी 7 वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन केलं आहे. परीक्षा पे चर्चा प्रथमच ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. (Pariksha Pe Charcha 2021 by Narendra Modi Ramesh Pokhariyal said Around 14 lakhs students, teachers & parents have registered for 4th edition)

रमेश पोखरियाल काय म्हणाले?

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा एकूण 14 लाख जणांनी नोंदणी केली आहे.  परीक्षा पे चर्चा कार्यक्रम चौथ्यांदा होणार आहे. तर, परीक्षा पे चर्चा लेखन स्पर्धेत 81 देशांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

नरेंद्र मोदी यांनी #ExamWarriors हा हॅशटॅग वापरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा नवीन प्रकार, विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांनी विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बुधवारी 7 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.

Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दिली माहिती

परीक्षा पे चर्चामध्ये कोण सहभागी होतं?

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 9 वी ते 12 मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. कोरोना संसर्गामुळे यंदाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. 16 फेब्रुवारी 2018 ला परीक्षा पे चर्चामधील पहिला कार्यक्रम पार पडला होता. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं होतं.

परीक्षा पे चर्चामध्ये प्रथमच पालकांना संधी

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात. यंदा विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी 2.62 लाखांहून अधिक शिक्षकांनी, 10.39 लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील नोंदणी केली आहे. innovateindia.mygov.in या वेबसाईटवर नोंदणी करण्याची अंतिम तारीख 14 मार्च होती.

संबंधित बातम्या:

Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 8 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, पालकांना प्रथमच संधी

‘परीक्षा पे चर्चा’ मधून पंतप्रधान पुन्हा साधणार विद्यार्थ्यांशी संवाद, प्रकाश जावडेकरांची Koo वरून माहिती

(Pariksha Pe Charcha 2021 by Narendra Modi Ramesh Pokhariyal said Around 14 lakhs students, teachers & parents have registered for 4th edition)