AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pariksha Pe Charcha 2025 Registration: ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 साठी नोंदणी सुरू, असा करा अर्ज, PM मोदी देणार टिप्स

Pariksha Pe Charcha 2025 Registration: 'परीक्षा पे चर्चा' 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी 14 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. कार्यक्रमाचे आयोजन केव्हा होणार हे जाणून घेऊया. सर्व स्पर्धकांना 'परीक्षा पे चर्चा'मध्ये सहभागी होण्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

Pariksha Pe Charcha 2025 Registration: 'परीक्षा पे चर्चा' 2025 साठी नोंदणी सुरू, असा करा अर्ज, PM मोदी देणार टिप्स
Pariksha Pe CharchaImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Dec 23, 2024 | 3:04 PM
Share

Pariksha Pe Charcha 2025 Registration: ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी आणि पालक innovateindia1.mygov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या सर्व संलग्न शाळांसाठी परीक्षा पे चर्चा 2025 संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. चला जाणून घेऊया ‘परीक्षा पे चर्चा 2025’साठी निवड कशी केली जाईल.

ऑनलाईन एमसीक्यू स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. ही ऑनलाईन स्पर्धा 14 जानेवारी रोजी संपणार असून सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ही स्पर्धा आहे. सर्व स्पर्धकांना ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होण्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2025 आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ 2025 कधी होणार?

‘परीक्षा पे चर्चा’ची ही आठवी आवृत्ती आहे, जी जानेवारीमध्ये भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होणार आहे. मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालयातर्फे पीपीसी किट देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी पालक आणि शिक्षकांशी बोर्ड परीक्षांबाबत चर्चा करतील आणि विद्यार्थ्यांना टिप्स देतील.

परीक्षा पे चर्चा 2025 नोंदणी अर्ज कसा करावा?

  • innovateindia1.mygov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • होम पेजवरील पार्टिसिपेट नाऊ टॅबवर क्लिक करा.
  • आता स्टुडंट्स पार्टिसिपेटवर क्लिक करा.
  • आपले नाव आणि फोन नंबर प्रविष्ट करा आणि नोंदणी करा.
  • परीक्षा पे चर्चा 2025 नोंदणी लिंक विद्यार्थी या लिंकवर क्लिक करून देखील नोंदणी करू शकतात.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. तसेच, त्यांना परीक्षेचा दबाव आणि तयारीशी संबंधित टिप्स देतात. जे शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट, यूट्यूब आदींवर पाहता येईल. अधिक माहितीसाठी उमेदवार परीक्षा पे चर्चाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्त्वाची माहिती

लक्षात घ्या की, विद्यार्थी आणि पालक innovateindia1.mygov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात. सर्व स्पर्धकांना ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होण्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2025 आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ची ही आठवी आवृत्ती आहे, जी जानेवारीमध्ये भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होणार आहे. मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालयातर्फे पीपीसी किट देण्यात येणार आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.