Fact Check: सर्व शिक्षा अभियान बनावट वेबसाईट प्रकरण, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फेक वेबसाईटवरुन शिक्षक व इतर पदाच्या भरतीची माहितीचा राज्य शासनाच्या पदभरतीशी काहीही संबंध नसल्याचं या पूर्वी शासनाकडून स्पष्ठ केलं आहे. fake website shikshaabhiyan

Fact Check: सर्व शिक्षा अभियान बनावट वेबसाईट प्रकरण, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sarva Shiksha Abhiyan

मुंबई: सर्व शिक्षा अभियान या नावाने शासनाची कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही. http://shikshaabhiyan.org.in/index.php या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी कोणताही संबंध नाही. प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी याबाबत स्पष्टीकरण गुरुवारी दिलं आहे. आज त्या संदर्भात फेक वेबसाईटप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक व इतर पदाच्या भरतीची माहितीचा राज्य शासनाच्या पदभरतीशी काहीही संबंध नसल्याचं या पूर्वी शासनाकडून स्पष्ठ केलं आहे. (Police register case against fake website shikshaabhiyan at Marine Drive Police station)

नेमका प्रकार काय?

Shikshaaabhiyan.org या वेबसाईटवर sarva shiksha abhiyan recruitment 2021 या नावानं प्रायमरी , ज्युनिअर शिक्षक, कार्यालय स्टाफ, चपराशी अशा प्रकारची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे खोटी माहिती देण्यात आळी होती. मात्र ही वेबसाइट फेक असल्याचे समोर आले.

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी स्पष्टीकरण दिलं होतं. शासकीय अधिकाऱ्याने दिलेल़्या तक्रारीनुसार आज मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त एस चैतन्य यांनी दिली.

सावध राहण्याचं शासनाचं आवाहन

या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीचा, जाहिरातीचा आणि राज्य शासनाच्या समग्र शिक्षा योजनेशी काहीही संबंध नाहीये. त्यामुळे अशा वेबसाईटपासून सावध राहण्याचा आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलेलं आहे.

संबंधित बातम्या:

नरेंद्र मोदींकडून सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, ‘या’ भाजपशासित राज्यात दहावीची परीक्षा होणार

NIOS Class 12 Exam Cancelled: एनआईओएस बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

(Police register case against fake website shikshaabhiyan at Marine Drive Police station)