नवप्राध्यापकांवर स्वप्नील लोणकर याच्यासारखी वेळ यायला नको, प्राध्यापक भरतीसाठी नागपूर, पुण्यात आंदोलन

प्राध्यापक भरतीसाठी नेट सेट पात्रताधारक आणि तासिका तत्वावरील शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. नागपूरमधील संविधान चौकात नवप्राध्यापकांनी साखळी आंदोलन सुरु केलं आहे

नवप्राध्यापकांवर स्वप्नील लोणकर याच्यासारखी वेळ यायला नको, प्राध्यापक भरतीसाठी नागपूर, पुण्यात आंदोलन
प्राध्यापक भरती आंदोलन

नागपूर: प्राध्यापक भरतीसाठी नेट सेट पात्रताधारक आणि तासिका तत्वावरील शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. नागपूरमधील संविधान चौकात नवप्राध्यापकांनी साखळी आंदोलन सुरु केलं आहे. 19 जुलैपासून हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. दुसरीकडे पुण्यातही शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

स्वप्नील लोणकर सारखी आत्महत्येची वेळन नको

एमपीएसीची भरती न झाल्याने स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केलीय, आता नवप्राध्यापकांवर स्वप्नील लोणकर सारखी आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका, असं नव प्राध्यापकांनी सांगितलं आहे. पदभरती होत नसल्याने नवप्राध्यापक संकटात आहेत, ही व्यथा सरकारला कळावी म्हणून नागपूरात नवप्राध्यापक संघटनेचं बेमुदत साखळी उपोषण सुरु झालंय. पदभरतीच्या मागणीसाठी संविधान चौकात 19 जुलैपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु झालं असून, प्राध्यापक भरतीसाठी राज्य सरकार केव्हा पुढाकार घेणार? संतप्त सवाल नवप्राध्यापकांनी राज्य सरकारला केलाय. पुण्यातही नवप्राध्यापकांच्यावतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे.

तासिका तत्वावरील शिक्षकांना किती मानधन मिळतं?

पुण्यामध्ये 2018 मध्ये तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनानंतर सीएचबी तत्वावरील प्राध्यपकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी तासिका तत्वावरील शिक्षकांना प्रती तासिका 240 रुपयांप्रमाणं वार्षिक 210 तासांची रक्कम दिली जायची. राज्य सरकारनं 2018 मध्ये शासन आदेश काढून मानधनात वाढ केली. 60 मिनिटांच्या तासिकेसाठी 500 रुपये मानधन निश्चित करण्यात आले होते. मात्र, महाविद्यालयीन तासिकांची वेळ 48 मिनिटांची असल्यानं त्या प्रमाणात मानधन निश्चित करण्यात येते. संबंधित शासन आदेशात तासिका तत्वावरील शिक्षकांना दरमहा मानधन देण्यात यावं असा उल्लेख करण्यात आला होता. मानधनामध्ये वाढ देखील करण्यात आली होती. मात्र, सीएचबीवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना दरमहा मानधन दिलं गेल्याचं समोर आलेलं नाही.

जून महिन्यातही आंदोलन

वेळेवर न मिळणारं तटपुंजं मानधन, रखडलेली प्राध्यापक भरती या सर्व प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी पुण्यात सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समितीनं 21 जूनपासून आंदोलन सुरु केलं होतं. सेट नेट पीएचडी धारक संघर्ष समिती या संघटनेच्या वतीनं पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन 21 जून पासून होतं. पुण्यात आंदोलन करणाऱ्या या प्राध्यापकांना विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा देखील दिला होता. प्राध्यापक भरती सुरु करावी आणि इतर राज्यांच्या धरतीवर मासिक भत्ता बंद करून समान वेतन धोरण जाहीर करा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. बेमुदत धरणे आंदोलनाला युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी देखील भेट दिली होती.

इतर बातम्या:

राज्यात प्राध्यापक भरती लवकरच, तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढणार : उदय सामंत

VIDEO | पुण्यात प्राध्यापकांच्या विविध मागण्या, भजन करत वारकरी पद्धतीने आंदोलन

(Professor Recruitment protest started at Nagpur and Pune  by qualified candidates )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI