AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune School Reopening Date : पुण्यात शाळांची घंटा 15 डिसेंबरला वाजणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनं (Pune Municipal Corporation) शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा (Pune School Reopen) निर्णय घेतला आहे.

Pune School Reopening Date : पुण्यात शाळांची घंटा 15 डिसेंबरला वाजणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
सांकेतिक फोटो
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 30, 2021 | 1:15 PM
Share

पुणे: मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनं (Pune Municipal Corporation) शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा (Pune School Reopen) निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलधीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा  15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचं चित्र दिसून आलं होतं. अखेर पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळांची तयारी पूर्ण मात्र पालिकेचा सावध पवित्रा

पुण्यातील शाळांनी पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण केलीय. तर, दुसरीकडे शाळा सुरु करावी अशी पालकांची भूमिका आहे. मात्र, पुणे महापालिकेनं ओमिक्रॉन वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेत शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूरमध्येही आज निर्णय होणार

सोलापूर महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासंबंधीचा निर्णय आज घेण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर हे यासंबंधी निर्णय घेणार आहेत. तर, नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय देखील लांबणीवर टाकण्यात आला आहे. तर, मुंबई महापालिकेनं देखील पहिली ते चौथीचे वर्ग उद्यापासून सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुणे महापालिका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईतही 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार

पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार नाहीत. मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळं मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे.

इतर बातम्या:

Mumbai School Reopening: मुंबईत 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार, बीएमसीचा मोठा निर्णय

Solapur School Reopening: सोलापूर शहरातील शाळा सुरु की बंद, महापालिका आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...