राजर्षी शाहू महाराज अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करा,राजू वाघमारेंची मागणी

| Updated on: Sep 18, 2021 | 6:52 PM

राज्यातील सर्वात जुन्या राजर्षी शाहू महाराज अनुदानित वसतिगृह योजनेतील वसतीगृहात काम करणाऱ्या 8000 कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचटणीस व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे.

राजर्षी शाहू महाराज अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करा,राजू वाघमारेंची मागणी
राजू वाघमारे, काँग्रेस
Follow us on

मुंबई: राज्यातील सर्वात जुन्या राजर्षी शाहू महाराज अनुदानित वसतिगृह योजनेतील वसतीगृहात काम करणाऱ्या 8000 कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचटणीस व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे. राजू वाघमारे यांनी यांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सरकारी वेतनश्रेणी लागू करण्याबाबत अजित पवारांची भूमिका सकारात्मक असल्याचं वाघमारे यांनी म्हटलं.

राजर्षी शाहू योजनेतील कर्मचारी वंचित

राजू वाघमारे यासंदर्भात म्हणाले की, या योजनेनंतर सामाजिक न्याय खात्याच्या अनेक योजना आल्या व त्यानुसार अनुदानित आश्रमशाळा, अंध, अपंग, मूकबधिर योजनेतील शाळांच्या वसतीगृह कर्मचाऱ्यांना वेतणश्रेणी लागू झाली आहे. परंतु, राजर्षी शाहू योजनेतील हे कर्मचारी आजही समान काम समान वेतनापासून वंचित आहेत, त्यांना सरकारी नियमानुसार वेतन मिळणे आवश्यक आहे. 25 वर्षांपासून सातत्याने या घटकाला न्याय देण्याची मागणी केली जात असताना अद्यापही ती मान्य झालेली नाही.

तटपुंज्या पगारात हलाखीचं जीवन

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असता उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबधीत खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर बैठक घेण्यास सांगतो व तिथून प्रस्ताव आल्यावर त्यावर विचार करून सकारात्मक भूमिका घेऊ, असे आश्वासन दिले असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली. या योजनेतील हजारो कर्मचारी आज अगदी तटपुंजा पगारात काम करून हलाखीचे जीवन जगत आहेत. शासनाने सरकारी वेतनश्रेणी लागू केल्यास त्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल, असा विश्वासही डॉ. राजू वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.

किन्हवली येथे विधी महाविद्यालयाचे राज्यपालांकडून उद्घाटन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे विद्या प्रसारक मंडळाच्या नव्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्या प्रसारक मंडळाच्या नव्या विस्तारित इमारतीचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरविंद (आप्पा) भानुशाली, आमदार दौलत दरोडा व इतर निमंत्रीत उपस्थित होते.

इतर बातम्या:

खबरदार साक्ष फिरवलीत तर!!! हत्या प्रकरणी फितूर आई-मुलावर खटला भरण्याचे औरंगाबाद सत्र न्यायालयाचे आदेश

विसर्जनासाठी गेल्या, तीन सख्या बहिणी, त्यांच्या चार मैत्रिणी पाण्यात बुडाल्या, उत्साहाचं वातावरण क्षणार्धात बदललं

‘पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज’, मुनगंटीवारांचा जोरदार टोला

Raju Waghmare meet Ajit Pawar for employees of Rajarshi Shahu Maharaj Grantable Hostel pay scale issue