RTE अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ, प्लेग्रुप ते पहिलीसाठी वयोमर्यादा निश्चित

सन 2022-23  च्या आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार (Online Admission Process) मुलांचा प्रवेश घेण्‍यासाठी आता 10 मार्च 2022 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

RTE अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ, प्लेग्रुप ते पहिलीसाठी वयोमर्यादा निश्चित
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:17 AM

मुंबई: आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ देम्यात आली आहे. सन 2022-23  च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार (Online Admission Process) मुलांचा प्रवेश घेण्‍यासाठी आता 10 मार्च 2022 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009” अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांना अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत होती. परंतु, ही मुदत आता 10 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय (Age limit) निश्चित करण्याबाबत 18 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव 31 डिसेंबर करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी 28 फेब्रुवारी 2022 व 3 मार्च 2022 च्या शासकीय पत्रानुसार आर.टी.ई.25 टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा 31 डिसेंबर 2022 रोजी पुढीलप्रमाणे राहील.

  1. ‘प्लेग्रुप / नर्सरी’ साठी आता किमान वय 3 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 4 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत बालकाचा जन्म हा 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधी दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.
  2. ‘छोटा शिशु’ (ज्युनियर केजी) साठी आता किमान वय 4 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 5 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत बालकाचा जन्म हा 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधी दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.
  3. ‘मोठा शिशु’ (सिनियर केजी) साठी आता किमान वय 5 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 6 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत बालकाचा जन्म हा 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधी दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.
  4. ‘इयत्ता पहिली’ साठी आता आता किमान वय 6 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत बालकाचा जन्म हा 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधी दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.

इतर बातम्या:

Russia Ukraine War Live : आतापर्यंत 11 हजार भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढले

स्किमिंग म्हणजे काय; तुम्हालाही बसू शकतो या माध्यमातून मोठा आर्थिक फटका, फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.