सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सराव परीक्षांना 41 हजार विद्यार्थ्यांची दांडी, 10 एप्रिलपासून मुख्य परीक्षांचं आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सराव परीक्षांना 41 हजार विद्यार्थ्यांची दांडी, 10 एप्रिलपासून मुख्य परीक्षांचं आयोजन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सराव परीक्षांकडे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे. Savitribai Phule Pune University online practice exam

Yuvraj Jadhav

|

Apr 06, 2021 | 10:35 AM

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सराव परीक्षांना 5 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सराव परीक्षांकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे . सोमवारी 1 लाख 10 हजार 17 विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा देणे अपेक्षित होते. मात्र, केवळ 68 हजार 470 जणांनीच परीक्षा दिल्याचे समोर आले. तर 41 हजार 547 विद्यार्थ्यांनी या परीक्षांकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे. विद्यापीठांमधील ऑनलाईन परीक्षेचा सावळा गोंधळ मागील वर्षी संपूर्ण राज्याने पाहिला. त्या पार्श्वभूमीवर यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मुख्य परीक्षेपूर्वी सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. (Savitribai Phule Pune University online practice exam forty one thousand absent)

10 एप्रिलपासून मुख्य परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सराव परीक्षा 5 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेचा सराव करत त्याचे तंत्र समजावून घेता येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली होती. 10 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये पुणे, अहमदनगर आणि नाशिकया तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करुन माहिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये विद्यापीठाच्या परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सत्र परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑनलाईन परीक्षा नेमकी कशी असेल याची तांत्रिक बाजू विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टिकोनातून सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 5 ते 9 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळात ही सराव परीक्षा होत आहे.

सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सराव परीक्षेला 3 लाख विद्यार्थी बसतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. 5 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत सराव परीक्षा होणार आहे.

गोंधळ टाळण्यासाठी मोठी खबरदारी

दरम्यान विद्यापीठाच्या पहिल्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक टप्याटप्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे. ही परीक्षा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून बहुपर्यायी स्वरूपात असणार आहे. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत इ मेल आयडीवर आणि मोबाईल क्रमांकवर माहिती देण्यात येईल. sppuexam.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना सूचना, युजर मॅन्युअल आणि व्हिडीओच्या माध्यमातून परिक्षेविषयी माहिती दिली आहे. तसंच विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास हेल्पलाईन 020- 71530202 क्रमांकही देण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या कंपनीकडून ऑनलाईन परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 10 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याबाबतची सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार रविवारी सुद्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाच्या कंपनीतर्फे परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले जाणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेत व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार आहे. मात्र, काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर आयोजित कराव्यात, असे विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे. प्रथम सत्र वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, एम.एड.,एम.पी.एड, बीएस्सी -बी.एड., बी.ए- बी.एड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संबंधित अभ्यास मंडळाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार 70 टक्के अभ्यासक्रमावर होणार आहेत.

संबंधित बातम्या:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सराव परीक्षांना सुरुवात, 10 एप्रिलपासून मुख्य परीक्षांचं आयोजन

Pariksha Pe Charcha 2021: परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची तारीख ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दिली माहिती

(Savitribai Phule Pune University online practice exam forty one thousand absent)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें