यंदा एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार, रविवारची सुटीही रद्द, विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीला परवानगी

| Updated on: Mar 25, 2022 | 10:01 AM

पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Student) महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी शाळा (School) एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच यंदा वार्षिक परीक्षा (Examination)एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.

यंदा एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार, रविवारची सुटीही रद्द, विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीला परवानगी
एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार
Follow us on

पुणे : पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Student) महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी शाळा (School) एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच यंदा वार्षिक परीक्षा (Examination)एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी आदेश देण्यात आले आहेत. देशासह राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाला असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना रविवारी देण्यात येणारी आठवडी सुटी आणि शनिवारची हाफ सुटी देखील रद्द करण्यात आली आहे. रविवारी ज्या विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्याची इच्छा असेल ते विद्यार्थी वर्गात बसू शकतात असे सांगण्यात आले आहे.

काय आहे शिक्षण विभागाचा नवा आदेश?

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत आणि शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण विभागाकडून गुरुवारी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. नव्या परिपत्रकानुसार आता एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत 100 टक्के उपस्थितीसह विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू राहणार आहेत. साधारणपणे मार्च महिन्यात विद्यार्थ्यांची केवळ सकाळच्या सत्रात शाळा भरवली जाते. मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाल्याने एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या 100 टक्के उपस्थितीसह शाळा सुरू ठेवण्यास परवानगी असेल, तसेच शनिवार आणि रविवारी देखील पूर्ण वेळ शाळा भरेल. ज्या विद्यार्थ्यांना रिविवारी शाळेत यायचे आहे, ते रिविवारी देखील शाळेत येऊ शकतात असे या आदेशात म्हटले आहे.

परीक्षा एप्रिलच्या शेवटी

यंदा एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत. तसे आदेश शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना देण्यात आले आहेत. या काळात विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यावर भर देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा यंदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होतील. तसेच निकाल मे महिन्यात जाहीर केला जाईल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होत नाही, मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत होणार आहे.

संबंधित बातम्या

MPSC Exam : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी गूडन्यूज, राज्य सरकारची तब्बल 6 हजार जागा भरण्याची मागणी

Offline exam|दहावी, बारावीप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षाही होणार ऑफलाईन ; लवकरच जाहीर होणार निणर्य?

cuet entrance exam 2022: केंद्रीय विद्यापीठातील प्रवेश सीईटीद्वारेच, यूजीसीचं विद्यापीठांना पत्र