cuet entrance exam 2022: केंद्रीय विद्यापीठातील प्रवेश सीईटीद्वारेच, यूजीसीचं विद्यापीठांना पत्र

: विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठात पदवी (Central University Entrance Test) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य केली आहे.

cuet entrance exam 2022: केंद्रीय विद्यापीठातील प्रवेश सीईटीद्वारेच, यूजीसीचं विद्यापीठांना पत्र
संग्रहित छायाचित्र Image Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 2:07 PM

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठात पदवी (Central University Entrance Test) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य केली आहे. कॉमन युनिवर्सिटी एंट्रास टेस्ट (CUET) म्हणजेच सीयूईटी परीक्षा देऊनचं बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठात प्रवेश घेता येणार आहे. देशातील 42 केंद्रीय विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगानं यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. तर, प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय विद्यापीठातील प्रवेश परीक्षांचं आयोजन करण्याची जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे देण्यात आलेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं सीयूसीटीची पद्धत राज्य विद्यापीठ देखील स्वीकारू शकतात, असं म्हटलं आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून सीयूसीटी अनिवार्य करण्यात आल्यानं बारावी परीक्षेमध्ये मिळवलेले गुण नाममात्र राहणार का प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे नेमके आदेश काय?

देशातील सर्व विद्यापीठ अनुदान आयोगाशी संलग्नित केंद्रीय विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सत्र 2022-2023 पासून सुरू होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. पदवी प्रवेशासाठी कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा  घेतली जाणार आहे.

सीयूईटी 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, आसामी, बंगाली, पंजाबी, ओडिया भाषांमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाईल. केंद्रीय विद्यापीठांची प्रवेश परीक्षा स्थानिक भाषेत होणार असल्यानं देशातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी परीक्षेचं आयोजन करणार

केंद्रीय विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेचं आय़ोजन करण्याची जबाबदारी यूजीसीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी सीयूसीटी परीक्षेचं आयोजन करेल. ही प्रक्रिया htttps://nta.ac.in या वेबसाईट वर या परीक्षेची नोंदणी सुरु होईल. सीयूईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल.

राज्य आणि खासगी विद्यापीठांना स्वीकारण्याचा सल्ला

विद्यापीठ अनुदान आयोगानं केंद्रीय विद्यापीठांसाठी लागू केलेली सीयूईटी परीक्षा राज्य, खासगी आणि अभिमत विद्यापीठांनी ते या सीयूईटीचा स्वीकार करावा, असं विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सूचवण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

CISF Recruitment 2022 : सीआयएसएफमध्ये खेळाडूंसाठी 249 पदांवर मोठी भरती, 81 हजारांपर्यंत पगाराची संधी

Shivsena-BJP भविष्यात एकत्रं येणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान; कारणही सांगितलं

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.