SET Exam 2021: सेटची परीक्षा 26 सप्टेंबरला; ‘या’ तारखेपासून अर्ज नोंदणीला सुरुवात

26 सप्टेंबरला महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण 15 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. | SET Exam 2021

SET Exam 2021: सेटची परीक्षा 26 सप्टेंबरला; 'या' तारखेपासून अर्ज नोंदणीला सुरुवात
SET Exam 2021

पुणे: राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा येत्या २६ सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी (SET Exam 2021)  17 मे ते 10 जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यूजीसी महाराष्ट्र आणि गोवा (Goa) या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते. आतापर्यंत 36 वेळा सेट परीक्षा घेण्यात आली आहे. (set exam 2021 maharashtra will be held on 26 september)

गेल्यावर्षी करोनाच्या प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. ही परीक्षा सर्वात आधी नियमित वेळापत्रकानुसार 28 जून 2020 रोजी आयोजित केली जाणार होती, मात्र करोना संसर्गामुळे ती लांबणीवर पडली होती. एकूण 61114 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, यापैकी 4114 उमेदवार SET परीक्षेत उत्तीर्ण झाले होते.

आता विद्यापीठाकडून 37व्या सेट परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. 26 सप्टेंबरला महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण 15 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेविषयीची अधिक माहिती ttp://setexam.unipune. ac.in या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची सांगितले.

कोविड टास्क फोर्सद्वारे मदत कार्य सुरु करा, यूजीसीचे विद्यापीठांना आदेश

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये कोविड टास्क फोर्स समिती स्थापन करण्याचे आदेश, यूजीसीनं दिले आहेत. प्राध्यापक, शिक्षक , विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा टास्क फोर्समध्ये समावेश करावा अशा सूचना आयोगानं दिल्या आहेत.

यूजीसीनं कोविड टास्क फोर्सद्वारे शक्य होईल तितकी मदत करावी आणि समाजामधील विविध घटकांचं समुपदेशन करण्याचे आदेश यूजीसीनं दिले आहेत. युजीसीचे अध्यक्ष डॉ.डी पी सिंह यांनी विद्यापीठांना पत्रक पाठवलं आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठात कोविड हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या:

PM Scholarship Scheme 2021: पीएम स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सुरु, माजी सैनिकांच्या पाल्यांना 10 हजार रुपये मिळणार

AICTE ने जारी केले शैक्षणिक कॅलेंडर, जाणून घ्या परीक्षेच्या तारखा आणि समुपदेशनाचा संपूर्ण तपशील

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मायक्रोसॉफ्ट आणतंय खास फीचर

(set exam 2021 maharashtra will be held on 26 september)