AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AICTE ने जारी केले शैक्षणिक कॅलेंडर, जाणून घ्या परीक्षेच्या तारखा आणि समुपदेशनाचा संपूर्ण तपशील

या कॅलेंडरनुसार (AICTE Academic Calendar 2021) पहिल्या टप्प्यातील समुपदेशन किंवा इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. (Academic calendar issued by AICTE, know exam dates and full details of counseling)

AICTE ने जारी केले शैक्षणिक कॅलेंडर, जाणून घ्या परीक्षेच्या तारखा आणि समुपदेशनाचा संपूर्ण तपशील
एआयसीटीईचे सुधारीत कॅलेंडर जारी, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार
| Updated on: May 08, 2021 | 5:13 PM
Share

AICTE Academic Calendar 2021 नवी दिल्ली : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने 2021-22 या शैक्षणिक वर्षाचे कॅलेंडर जाहीर केले आहे. हे कॅलेंडर (AICTE Academic Calendar 2021) अधिकृत वेबसाईट aicte-india.org वर प्रसिद्ध केले गेले आहे. यासह एआयसीटीईतर्फे अभियांत्रिकी संस्थांसाठी नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. देशातील सर्व टेक्निकल इन्स्टिट्युटमध्ये 15 सप्टेंबर 2021 पासून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होतील, अशी माहिती काऊन्सिलने दिली. या कॅलेंडरनुसार (AICTE Academic Calendar 2021) पहिल्या टप्प्यातील समुपदेशन किंवा इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. या कॅलेंडरमध्ये आपण वर्षभराच्या कार्यक्रमांचा तपशील पाहू शकता. कोरोना संसर्ग लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे परिषदेने हे कॅलेंडर तयार केले आहे. एआयसीटीईने उच्च शैक्षणिक संस्थेला विद्यार्थ्यांना संपूर्ण फी जमा करण्यास दबाव टाकू नये असे सांगितले आहे. (Academic calendar issued by AICTE, know exam dates and full details of counseling)

AICTE Academic Calendar मध्ये अनुदान व जागा वाटपाची तारीख

– कॅलेंडरनुसार टेक्निकल इन्स्टिट्युटच्या मंजुरीची अंतिम तारीख 30 जून आहे. – विद्यापीठ किंवा संस्था मान्यताप्राप्त करण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. – समुपदेशन / प्रवेशाच्या पहिल्या फेरीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. – समुपदेशन / प्रवेशाच्या पहिल्या फेरीची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2021 आहे. – तांत्रिक कोर्स प्रवेश रद्द झाल्यास संपूर्ण फी परतावा तारीख 10 सप्टेंबर 2021 आहे.

15 सप्टेंबरपर्यंत रिक्त जागांवर मिळणार प्रवेश

पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेश मिळेल आणि त्याच दिवसापासून वर्ग सुरू होईल. तसेच 20 सप्टेंबर 2021 रोजी दुसर्‍या वर्षासाठी लेटरल एन्ट्री अॅडमिशन अंतिम मुदत दिली गेली आहे. – स्टँडअलोन पीजीडीएम व पीजीसीएम महाविद्यालयांच्या महत्त्वाच्या तारखा, संस्थांसाठी अनुदान प्रक्रियेची अंतिम तारीख – 30 जून 2021 – स्टँडअलोन पीजीडीएम आणि पीजीसीएम संस्था चालू आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी वर्ग प्रारंभ तारीख – 1 जुलै 2021 – प्रवेश रद्द करणे आणि फी मागे घेण्याची अंतिम तारीख – 5 जुलै – पीजीडीएम आणि पीजीसीएम संस्थांमध्ये प्रवेशाची अंतिम तारीख – 10 जुलै (Academic calendar issued by AICTE, know exam dates and full details of counseling)

इतर बातम्या

आमच्या शेतकऱ्यांना पीए किसान योजनेचे प्रत्येकी 18 हजार रुपये द्या, ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र

ज्वेलर्ससाठी चांगली बातमी! हॉलमार्किंग नसले तरी आता दंड किंवा शिक्षा नाही; काय आहे संपूर्ण प्रकरण?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.