AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे नसतानाही उपचारासाठी धडपड, रुग्णालयातूनच इंजेक्शनची चोरी, नातेवाईकांना अश्रू अनावर

धुळ्यात रुग्णाच्या नातेवाईकांनी आणून दिलेले इंजेक्शन थेट रुग्णालयातून चोरी झाल्याचे समोर आले आहे.

पैसे नसतानाही उपचारासाठी धडपड, रुग्णालयातूनच इंजेक्शनची चोरी, नातेवाईकांना अश्रू अनावर
DHULE MEDICAL COLLEGE
| Updated on: May 08, 2021 | 4:52 PM
Share

धुळे : राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे सगळे हैराण आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन तसेच इतर औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. औषधी वेळेवर मिळत नसल्यामुळे आधीच रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे. यानंतर आता धुळ्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी आणून दिलेले इंजेक्शन थेट रुग्णालयातून चोरी झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयांच्या अतंर्गत तसेच बाहेर इंजेक्शनची चोरी करणाऱ्या लोकांचं जाळं सक्रिय नाही ना ? असा प्रश्न विचारला जातोय. (injection of patient admitted for Mucormycosis has been stolen Dhule relatives demands investigation)

नेमका प्रकार काय ?

मुडावद येथील एका रुग्णाला म्युकर मायकोसिसवरील (Mucormycosis) उपचारासाठी धुळ्यातील जवाहर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून या रुग्णावर येथे उपचार सुरु आहेत. रुग्णावरील उपचारादरम्यान डॉक्टरांनी आंफोमूल नावाचे 6 इंजेक्शन आणण्यास सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नातेवाईकांनी 6 इंजेक्शन आणून दिले. त्यापैकी डॉक्टरांनी 2 इंजेक्शन रुग्णाला दिले. उर्वरित 4 इंजेक्शन डॉक्टरांनी ठेवून दिले होते. याच काळात एका रात्रीतून हे चारही इंजेक्शन चोरीला गेले.

औषधालयातील बॉक्सवर रुग्णाचे नाव 

हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी ज्या औषधालयामध्ये जाण्याचे सांगितले त्याच औषधालयात हे इंजेक्शन पुन्हा सापडले. विशेष म्हणजे या औषधालयातील एका बॉक्सवर ज्या रुग्णाचे इंजेक्शन गायब झाले होते, त्याच रुग्णाचे नाव होते. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात तसेच इतर आजारांवर उपचार वेळेवर मिळत नसताना धुळ्यात इंजेक्शन चोरी करणारी टोळी सक्रिय आहे का? असा सवाल विचारला जातोय.

नातेवाईकांच्या डोळ्यातं आश्रू

हा प्रकार समोर आल्यानंतर जवाहर मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, या प्रकाराबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही बाजू मांडण्यास टाळाटाळ केली. मात्र, जवळ पैसे नसूनसुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना इंजेक्शन उपलब्ध करुन दिले. उपचार व्यवस्थित होतील ही आशा असताना ऐनवेळी ते चोरीला गेल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सध्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून औषधालय, डॉक्टर, तसेच इंजेक्शन चोरणाऱ्यांविरुद्ध  कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

इतर बातमी :

बारावी पास बोगस डॉक्टर, इंटरनेवरुन उपचार, प्रेमी युगुलांचे अवैध गर्भपात, पुस्तकं वाचून औषधं

कोरोनावरील आणखी एका औषधाला मंजुरी, DRDO नं बनवलेलं औषध ऑक्सिजनची आवश्यकता कमी करणार

रोज किती मीठ खायचं?; जागतिक आरोग्य संघटनेकडून गाइडलाईन जारी !

(injection of patient admitted for Mucormycosis has been stolen Dhule relatives demands investigation)

Follow Us
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...